Local Body Elections : काँग्रेसचा पारंपरिक गड, भाजपची वाढती ताकद

In Buldhana, rebels pose a challenge to Congress and BJP : बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस-भाजप आमनेसामने; फोडाफोडी आणि नाराजीचे आव्हान

Buldhana जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसला भाजपकडून तगडे आव्हान मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. ‘पंचायत ते पार्लमेंट भाजपला मजबूत करा’ हा पक्षश्रेष्ठींचा नारा आणि कार्यकर्त्यांमध्ये उसळलेली चुरस यामुळे निवडणुका रंगतदार होणार आहेत.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात भाजप उमेदवाराला किमान ५१ टक्के मते मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. हाच पॅटर्न बुलढाण्यात राबविण्याचे संकेत मिळत असून, पक्षाने उमेदवारांच्या निवडीसाठी ‘जिंकण्याची शक्यता ज्यांची जास्त, त्यांनाच तिकीट’ हा फॉर्म्युला स्वीकारल्याचे दिसत आहे. परिणामी, ग्रामीण व शहरी भागांत भाजपचे कार्यकर्ता संवाद मेळावे आणि बैठका मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहेत.

Khadakpurna Dam : खडकपूर्णा ‘ओव्हर फ्लो’; १९ दरवाजे उघडले!

बुलढाणा जिल्हा परंपरेने काँग्रेसकडे झुकलेला मानला जातो. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत भाजपने तब्बल २४ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणत काँग्रेसच्या गडावर तडे दिले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांत काँग्रेसला आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे.

२०१७ ची निवडणूक आकडेवारी

पालिका (३०१ जागा) : काँग्रेस – १०३, भाजप – ७५

जिल्हा परिषद (६० जागा) : काँग्रेस – १४, भाजप – २४

पंचायत समिती (१२० जागा) : काँग्रेस – ३१, भाजप – ३९

एकूण (४८१ जागा) : काँग्रेस – १४८, भाजप – १३८

State debt : राज्यावर १० लाख कोटींचे कर्ज, लोढांच्या विभागावर आरोप !

 

सहयोगी पक्षांसोबत रणनीती

काँग्रेससोबत उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची रणनीतिक चर्चा सुरू आहे. काँग्रेसला काही प्रमाणात गळती लागली असली तरी दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी मिळत आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसला मोट बांधणे गरजेचे आहे, अन्यथा भाजपला मिळालेला मागील तडा यंदा मोठ्या भगदाडात बदलू शकतो, अशी भीती काँग्रेस श्रेष्ठींना सतावत आहे.

गेल्या निवडणुकांत शहरी भागात भाजपने आपले बळ दाखविले होते, मात्र ग्रामीण भागात पक्ष तुलनेने कमजोर होता. यंदा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी विशेष रणनीती आखत लोणार, मेहकर, सिंदखेड राजा व मोताळा तालुक्यांत बैठका घेऊन पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे.

Cabinet meeting : कॅबिनेट बैठकीत ओल्या दुष्काळाच्या निर्णयाची प्रतीक्षा !

भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण होत असल्याचे आरोप विरोधक करत आहेत. त्याचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, मात्र स्वपक्षीय नाराजीही ओढवण्याची शक्यता आहे. शिंदेसेना व अजित पवार गटाच्या नेत्यांचा समतोल साधणे हे भाजपसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.