In six municipal councils, women voters outnumber men : सहा पालिकांत महिला मतदार पुरुषांपेक्षा अधिक
Amravati ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ असे म्हटले जाते. संस्कार, कुटुंब आणि समाजघडणीची स्त्री ही केंद्रबिंदू मानली जाते. संत तुकारामांनीही ‘स्त्री शक्ती हीच समाजाची खरी ओळख, तिचा निर्णयच भविष्य घडवतो,’ असे सांगितले आहे. या बलस्थानाला सिद्ध करीत अमरावती जिल्ह्यातील महिला मतदार यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या संख्येने पुढे आल्या असून, या वेळी महिलाशक्तीच निवडणुकीतील ‘गेम चेंजर’ ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
जिल्ह्यातील १२ नगरपरिषदांच्या मतदारसंख्येच्या विश्लेषणातून पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जवळपास बरोबरीत असून, काही ठिकाणी त्या स्पष्टपणे वरचढ आहेत. महिला मतदारांचे सरासरी प्रमाण तब्बल ९५.४५ टक्के आहे, तर सहा पालिकांत महिला मतदार पुरुषांपेक्षा जास्त आहेत. हा आकडा स्त्री सक्षमीकरण, सामाजिक बदल आणि राजकीय जागरूकतेचे चिन्ह मानला जात आहे.
Mahayuti Governemt :आर.आर. आबांच्या संकल्पनेतील या योजनेचा सरकारला विसर
जिल्ह्यातील १० नगरपरिषद आणि २ नगरपंचायतींसाठी एकूण ४१८ मतदान केंद्रे तयार करण्यात येत असून, प्रत्येक पालिकेत एक ‘पिंक बूथ’ असेल. या बूथवर संपूर्ण कर्मचाऱ्यांचा स्टाफ—केंद्राध्यक्ष, तीन कर्मचारी आणि पोलिस सेवा—सर्व महिला असतील. या बूथला आकर्षक सजावट करून विशेष ओळख देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
स्त्री मतदारसंख्येत लक्षणीय वाढ
२०१७ मध्ये महिला मतदार : १,४४,५०२
२०२५ मध्ये महिला मतदार : १,७९,०३२
वाढ : ३४,५३०
Akola Municipal Corporation : मतदार यादीत दिरंगाई केली तर फौजदारी कारवाई
पुरुष मतदारांची वाढ (२४,७५९) झाली असली तरी महिला मतदारांची वाढ त्यापेक्षा ९,७७१ ने अधिक आहे. महिला मतदारांचा वाढता प्रतिसाद हा समाजातील बदलत्या विचारसरणीचा द्योतक आहे. नगरपरिषद निवडणुकांत ५० टक्के आरक्षणामुळे महिलांचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
महिला-पुरुष मतदार तुलना (निवडक पालिका)
महिला मतदार पुरुषांपेक्षा अधिक असलेल्या पालिका
Gauri Palve suicide case : गौरीच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप !
पालिका महिला पुरुष महिला टक्का
दर्यापूर 18,429 18,142 101.58%
मोर्शी 16,469 16,115 102.19%
चिखलदरा 1,749 1,615 108.29%
चांदूर रेल्वे 9,237 8,895 103.91%
चांदूरबाजार 9,525 9,265 102.80%
धारणी 6,947 6,256 111.04%
Local body elections : अजित पवारांच्या टीकेला भाजप मंत्री मेघना बोर्डीकरांचा प्रतिहल्ला
जवळपास बरोबरी असलेल्या पालिका
पालिका महिला पुरुष महिला टक्का
अचलपूर 49,623 50,031 99.18%
अंजनगाव 22,697 23,923 94.87%
वरुड 20,409 20,481 99.64%
शेंदुरजना 9,166 9,627 95.21%
धामणगाव 8,797 9,326 94.32%
नांदगाव 5,984 6,055 98.82%
यंदा पुरुष फक्त ९८३ जास्त
२०१७च्या तुलनेत महिलांची वाढ लक्षणीय असून, महिला आणि पुरुष मतदारसंख्या आता जवळपास समान आहे. यंदा महिला मतदार पुरुषांपेक्षा केवळ ९८३ ने कमी आहेत, जे मोठे बदलते चित्र आहे.








