Incoming-outgoing among political parties started : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला वेग
Washim स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नाही. कोणत्या महिन्यात निवडणुका होणार, याचा अद्याप अंदाजही आलेला नाही. पण वाशिम जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक पक्षांमध्ये नव्या प्रवेशांची लाट आली आहे. इनकमिंग-आउटगोइंग वाढले आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच उकाडा वाढला आहे.
मानसन्मान मिळत नसल्याचे कारण देत काही पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केले आहे. तर आणखी काही जण पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये हे नवे समीकरण कसे जुळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या काळात पक्षांना कार्यकर्त्यांची गरज असते. तसेच कार्यकर्त्यांना पक्षाची ताकद हवी असते.
Shambhuraj Desai : लोणार सरोवर येथील सोयीसुविधांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अनेकदा पक्षांकडून कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळत नाही. किंवा कार्यकर्त्यांकडून पक्षाला अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्यामुळे दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण होतात. कार्यकर्ते पक्ष सोडून इतरत्र प्रवेश करतात. अनेक कार्यकर्ते तन-मन-धनाने पक्षाचे निष्ठेने काम करतात. पण योग्य संधी मिळाली नाही तर नाराज होऊन नव्या पक्षाचा आधार घेतात.
येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत, महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना अपेक्षित संधी मिळावी म्हणून अनेकजण पक्षांतर करत आहेत. देशात एनडीए व राज्यात महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा ओढा महायुतीकडे वाढला आहे. स्थानिक पातळीवर जनतेच्या कामांना गती मिळावी यासाठी सत्ता असणे आवश्यक असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.
Crime in Gondia : वर्षभर घरातच चोरी; अल्पवयीन मुलाची भलतीच Daring!
काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांत प्रवेश केला आहे. तर काही पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. मागासलेला जिल्हा म्हणून वाशिममध्ये शैक्षणिक, औद्योगिक आणि कृषी विषयक विकासाला गती देणे गरजेचे आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे नेते आणि पदाधिकारी कोण ठरतात, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.