MNS confident of winning elections : चिखलीत जिल्हाध्यक्षांनी घेतली बैठक
Chikhli आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बुलढाणा जिल्ह्यात आपली निवडणूक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात पक्षाची महत्वपूर्ण बैठक चिखली येथील जिल्हा संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी जाहीर केले की, “बुलढाणा जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे आता थेट मैदानात उतरणार आहे.”
Local Body Elections : ‘मलाच तिकीट द्या, निवडूनच येतो’, उमेदवारांच्या दाव्याने नेते हैराण
या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे करून खात्रीशीर विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष बरबडे यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करून पक्षाच्या झेंड्याखाली बुलढाणा जिल्ह्यात मनसेचा प्रभाव वाढवण्याचे आवाहन केले.
या बैठकीस उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, जिल्हा सचिव डॉ. योगेश काळे, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, चिखली तालुकाध्यक्ष विनोद खरपास, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, मोताळा तालुकाध्यक्ष अमोल गोरे यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Local Body Elections : महाविकास आघाडी एकजुटीच्या मार्गावर; भाजप उमेदवार निवडीच्या मागे
जिल्हाध्यक्षांच्या घोषणेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुक उमेदवारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मनसेच्या उमेदवारांकडून मजबूत लढत अपेक्षित आहे.








