Local Body Elections : इच्छुकांच्या भेटीगाठी वाढल्या, नेत्यांच्या दरबारी चकरा वाढल्या

NMC’s preparations are based on the ward structure as per 2017 : २०१७ च्या प्रभाग रचनेनुसारच महापालिकेला करावी लागेल तयारी

Nagpur इच्छुक उमेदवारांच्या लोकांशी भेटीगाठी वाढल्या आहेत. नेत्यांच्या दरबारी चकरा सुरू झाल्या आहेत. आपल्या कामांचा लेखाजोखा लोकांपुढे मांडण्याची तयारी सुरू झाली आहे. कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टिपथात आहेत. नागपूर महानगरपालिकेतही इच्छुकांची जोरदार तयारी सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशांनुसार निवडणूक आयोगात कुठलीही हालचाल नसली तरीही राजकीय पक्ष मात्र मैदानात उतरले आहेत.

नागपूरसह राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असे वाटत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेच नागपूर महापालिकेच्या निवडणूक विभागाने तयारी केली होती. मात्र ४ आठवडे लोटूनही राज्य निवडणूक आयोगाकडून कुठलेही निर्देश आलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणुका लवकरच होतील, याबाबत अजूनही साशंकताच आहे.

Employment Guarantee Scheme (EGS) Committee : विधिमंडळाच्या रोहयो समितीचा दौरा, प्रशासनात खळबळ

महायुतीचे सरकार २०१७ प्रमाणेच प्रभागरचना ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार विचाराधीन आहे. त्यामुळे नागपूर महापालिका क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच ३८ प्रभागांत १५१ नगरसेवकांची संख्या राहण्याची शक्यता आहे. प्रभागरचना झाल्यानंतर आयोग आरक्षण व मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करेल. २०११ च्या जनगणनेनुसार २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभागरचना होती.

त्यावेळी ३८ प्रभाग होते. त्यात १५१ नगरसेवक निवडून आले. ३७ प्रभागात ४ नगरसेवक निवडून आले. प्रभाग ३८ मध्ये तीन नगरसेवक निवडून आले होते. याशिवाय ५ नगरसेवकांना नामनियुक्त सदस्य म्हणून निवडण्यात आले होते. आगामी मनपा निवडणूकही २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. चार सदस्यीय प्रभाग रचना राहणार असल्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी यासंदर्भात निकाल देत चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.

MLA Nitin Deshmukh : झुंडशाहीला प्रत्युत्तर देणारच; दबावाला बळी पडणार नाही

महानगरपालिकेची निवडणुकीच्या दृष्टीने तयारी झाली आहे. निवडणूक आयोगाकडून अजून निर्देश मिळालेले नाहीत. प्रभाग रचना चार सदस्यीय राहण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून नोटिफिकेशन निघाल्यानंतर महानगरपालिकेचा निवडणूक विभाग कामाला लागेल, असे मनपा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.