No relief from the High Court for candidates whose applications were rejected : उमेदवारी अर्ज रद्दचा निर्णय कायम; याचिकाकर्ते बॅकफुटवर
Khamgao नोटरी परवान्याची मुदत संपलेल्या वकिलाकडून शपथपत्र प्रमाणित केल्याच्या आरोपावरून उमेदवारी रद्द झालेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवार वर्षा जसवानी आणि शीतल देशमुख यांना उच्च न्यायालयातूनही दिलासा मिळाला नाही. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळण्याची भूमिका स्पष्ट केल्याने, दोघींनी सुनावणीदरम्यानच याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला.
खामगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज मंगळवारी जिल्हा न्यायालयाने अवैध ठरविले होते. या निर्णयाविरोधात दोन्ही उमेदवारांनी बुधवारी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
Food and Drugs Department : जिल्ह्यात रेशनमधून निकृष्ट तांदूळ-ज्वारीचे वितरण
सुनावणी करताना न्यायालयाने स्पष्ट सूचित केले की— “तुम्ही याचिका मागे घेतली नाही तर आम्हाला ती फेटाळावी लागेल.” या कठोर सूचनेनंतर जसवानी आणि देशमुख यांनी याचिका मागे घेतली. परिणामी, जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम राहिला आणि दोघींचीही निवडणूक शर्यतीतून हकालपट्टी झाली.
या निर्णयामुळे खामगावातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवार वर्षा जसवानी यांचा अर्ज छाननीवेळीच निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी अमान्य ठरविला होता.
Khamgao APMC : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्रीकृष्ण टिकार!
शीतल देशमुख यांच्या उमेदवारीविरोधात गायत्री थानवी यांनी जिल्हा न्यायालयात आक्षेप दाखल केला होता. न्यायालयाने त्यावर दिलेल्या निकालात देशमुख यांचा अर्जही बाद झाला. दोन्ही उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती; मात्र न्यायालयाच्या भूमिकेनंतर त्यांना याचिका मागे घ्यावी लागली.








