Breaking

Local Body Elections : कुणाची संधी हुकली; काहींना पुन्हा लॉटरी!

Reservation for Sarpanch posts of 870 Gram Panchayats announced : ८७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; ग्रामीण भागात उडणार राजकीय धुराळा

Buldhana जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण १६ एप्रिल रोजी तालुकास्तरावर निश्चित झाले आहे. त्यामुळे, ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी विद्यमान सरपंचांना सधी मिळाली तर काही जणांची संधी हुकल्याचे चित्र आहे. आता महिलांसाठीच्या ५० टक्के आरक्षणाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

हे आरक्षण निश्चित करण्यासाठी २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सोडत घेण्यात येणार आहे. त्यामुळे महिला आरक्षणाचे नेमके चित्र या दिवशी स्पष्ट होणार असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. याच पार्श्वभूमीवर सरपंच पदांवरील महिलांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

Ajit Pawar : बाजार समितीच्या सभापतींनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ!

८७० ग्रामपंचायतींपैकी ४३६ ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी आरक्षण निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सत्तास्थिती बदलण्याची शक्यता आहे. राजकीय समीकरणेही ढवळून निघतील, अशी चर्चा रंगू लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यात सध्या ४ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये जिल्ह्यातील ८७० पैकी तब्बल ५२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने सरपंच आरक्षणावर आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.