व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Elections : बुलढाणा, खामगाव, नांदुरा आणि लाेणार खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी

Local Body Elections : बुलढाणा, खामगाव, नांदुरा आणि लाेणार खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी

Reservation for the post of Municipal President announced : देउळगाव राजात एससी, मलकापूर ओबीसी महिलांसाठी राखीव

Buldhana स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून जिल्हा परिषद अध्यक्षपदानंतर राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्य बुलढाणा नगर पालिकेसह खामगाव, नांदुरा आणि लाेणार येथे सर्वच महिलांना संधी आहे तर देउळगाव राजा येथे अनुसुचीत जातीच्या महिलेसाठी तर मलकापुरात ओबीसी महिलेसाठी संधी राहणार आहे. या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे तर काही ठिकाणी संधीही मिळाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात ११ नगर पालिका असून दाेन ठिकाणी नगर पंचायत आहे. सध्या ११ नगर पालिकांच्या निवडणुकीची प्रक्रीया सुरू आहे. जिल्हा परिषदांचे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगर पालिकांच्या अध्यक्षांच्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले हाेते. साेमवारी राज्यातील २४७ नगर पालिका आणि १४७ नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाची आरक्षण साेडत ना. माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यापैकी अनुसुचीत जातीसाठी राखीव असलेल्या ३३ पैकी १७ पालिकांवर महिला राज येणार आहे.

Ravikant Tupkar : ‘शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत; याला जबाबदार व्यवस्था आहे’

नगर पालिका अध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांसह राजकीय पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ११ पैकी सहा नगर पालिकांवर महिला राज येणार असल्याने अनेकांना आपल्या पत्नीला निवडणुक रिंगणात उतरावे लागणार आहे. सहा नगर पालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आरक्षण साेडत जाहीर झाल्यानंतर आता कुभी खुशी कभी गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!