Saurabh Tayade becomes Maharashtra’s youngest municipal president : सिंदखेडराजा नगरपरिषदेत ‘तुतारी’चा ऐतिहासिक निनाद
Sindkhedraja सिंदखेडराजा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) ने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या २१ व्या वर्षी सौरभ विजय तायडे यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारत महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावला आहे. सौरभ तायडे यांनी ४,२८७ मते मिळवत हा दणदणीत विजय संपादन केला.
तिरंगी लढतीत १६९ मतांनी विजय
२ डिसेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ६, तर नगरसेवक पदासाठी ७०, असे एकूण ७६ उमेदवार रिंगणात होते.
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे युवा उमेदवार सौरभ विजय तायडे यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे श्याम किसनराव मेहत्रे
शिवसेना (शिंदे गट) चे अतिश बाळाजी तायडे
यांचा पराभव केला. सौरभ तायडे यांनी १६९ मतांच्या फरकाने विजय मिळवत केवळ सिंदखेडराजाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणात कमी वयात नगराध्यक्ष होण्याचा विक्रम नोंदवला आहे.
Local Body Elections : मुख्यमंत्र्यांच्या सभेने चिखलीत भाजपाचा ‘बोलबाला’
नगरपरिषदेत ‘तुतारी’चे वर्चस्व
नगरपरिषदेत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) — ८ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) — ६ जागा
शिवसेना (शिंदे गट) — ५ जागा
भाजप — १ जागा
असा निकाल लागला असून, शरद पवार गट नगरपरिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा दणका,ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची बदली !
विजयाचे श्रेय मतदारांना व कार्यकर्त्यांना
नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी ‘देशोन्नती’शी बोलताना आपल्या विजयाचे श्रेय सिंदखेडराजा शहरातील सर्व मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, वडील विजय तायडे तसेच शहरातील तमाम जनतेला दिले.
नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीचा अंतिम निकाल
सौरभ विजय तायडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गट) : ४,२८७ मते
श्याम किसनराव मेहत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजित पवार गट) : ४,११८ मते
अतिश बाळाजी तायडे (शिवसेना) : ३,४६३ मते
दिलीप भिकाजी चौधरी (अपक्ष) : १५८ मते
रंगनाथ आसाराम खाटीक (बसपा) : १२९ मते
अॅड. सैय्यद मुबीन सैय्यद नईम (अपक्ष) : ४६ मते
नोटा (NOTA) : ४६ मते
Cancer Hospital : दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय चंद्रपूर जिल्ह्याच्या कीर्तीत भर घालणार
तीन माजी नगराध्यक्षांचा पराभव; राजकीय वर्तुळात खळबळ
या निवडणुकीत मोठे राजकीय उलटफेर पाहायला मिळाले. शहराचे प्रथम नागरिकपद भूषवलेल्या तीन माजी नगराध्यक्षांना यावेळी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.
प्रभाग क्र. ३-ब मधून भाजपच्या उमेदवार व माजी नगराध्यक्ष सौ. नंदा विष्णू मेहत्रे,
प्रभाग क्र. २-अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी नगराध्यक्ष सिताराम चौधरी,
प्रभाग क्र. ४-ब मधून राजू आप्पा बोंद्रे,
यांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
विजयानंतर शहरात जल्लोष
या ऐतिहासिक विजयानंतर शहरात कार्यकर्त्यांनी फटाके, गुलाल व घोषणाबाजी करत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला.








