Local Body Elections : भाजपला रोखण्यासाठी शरद पवार गटाची जोरदार तयारी !

Sharad Pawar group is strongly preparing to stop BJP : राष्ट्रवादीचा जिल्हास्तरीय आढावा पूर्ण, शिवसेनेसह इतर समविचारी पक्षांसोबत चर्चेला दिला वेग

Nagpur : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आता भाजपला रोखण्यासाठी सज्ज झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील तालुका पातळीवर नुकत्याच झालेल्या बैठकांमध्ये समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तालुकास्तरावर पार पडलेल्या सर्व बैठकांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, निवडणूक प्रभारी सलील देशमुख, शैलेंद्र तिवारी, दिनेश साळवे आणि संदीप मोटघरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये विविध तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूकीला सामोरे जावे, अशी मागणी केली. त्यानुसार पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, प्रहार संघटना, रिपब्लिकन गट, वीरसा ब्रिगेड यांसारख्या संघटनांशी चर्चा सुरू केली आहे.

Pune land scam : ‘काका मला वाचवा’ हाकेला बावनकुळेंनी दिला ओ

काही इतर प्रादेशिक पक्षांनी पवार गटासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी सध्या समन्वय बैठका घेतल्या जात आहेत. भाजपला रोखण्यासाठी आम्ही तयारी पूर्ण केली आहे, असे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. पक्षाने निवडणूक संघटनात्मक तयारीसाठी जबाबदाऱ्यांचे वाटपही केले आहे. हिंगणा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी मंत्री रमेश बंग आणि माजी आमदार विजय घोडमारे यांना तर काटोल विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दीपक मोहिते आणि चंद्रशेखर कोल्हे यांना देण्यात आली आहे. जिल्ह्यात कुठेही अडचण किंवा मतभेद उद्भवल्यास निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेतृत्वाला देण्यात आले आहेत.

Peoples republican party : ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती फक्त शिंदे गटासोबतच

या बैठकीत राज्य सरकारवर तीव्र शब्दात टीका करण्यात आली. स्मार्ट मीटर लावून नागरिकांवर अन्याय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या केवळ घोषणा आणि मराठी आरक्षणाच्या नावाखाली ओबीसींवर अन्याय, असे आरोप पदाधिकाऱ्यांनी केले महागाई आणि बेरोजगारीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. परंतु सरकार केवळ घोषणा करत आहे. प्रत्यक्ष कृती काहीच नाही, अशीही टीका यावेळी करण्यात आली

शरद पवार गटाच्या हालचालीमुळे विदर्भात भाजप विरोधी आघाडी मजबूत होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आगामी काळात राजकीय समीकरणे नव्याने लिहिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.