Local Body Elections : अमरावतीत महायुतीत फूट? शिवसेना स्वबळावर मैदानात

Shivsena announced candidates in 6 out of 12 places: १२ पैकी ६ ठिकाणी उमेदवार घोषित; युतीचे प्रयत्न निष्फळ

Amravati आगामी नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्ह्यात स्वबळावर मैदानात उतरणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाशी स्थानिक पातळीवर युती करण्याचे प्रयत्न निष्फळ झाल्यामुळे जिल्ह्यात महायुतीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील १२ पैकी तब्बल ६ नगराध्यक्ष पदांचे उमेदवार शिवसेनेने अधिकृतरित्या जाहीर केले आहेत. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या पक्षाच्या घोषणेला आता अधिकृत पुष्टी मिळाली आहे.

Local Body Elections : अमरावतीत रिपाइंचे ऐक्य साधण्याची तयारी!

विधानसभा निवडणुकीत भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीच्या रूपाने एकत्र लढले होते आणि चांगले यशही मिळवले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीनही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकणार असल्याचे चित्र समोर येत आहे.

अमरावती जिल्ह्यातील १० नगरपरिषद व २ नगरपंचायतींमध्ये निवडणुका होत असून, स्थानिक पातळीवरील मतभेदांमुळे महायुतीची एकजूट राखली गेली नाही, असे अडसूळ यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे ६ नगराध्यक्ष उमेदवार जाहीर

आनंदराव अडसूळ यांनी जाहीर केलेले शिवसेनेचे उमेदवार पुढीलप्रमाणे :

दर्यापूर : प्रदीप मलिये
अंजनगाव सुर्जी : डॉ. स्पृहा डकरे
अचलपूर : रेखा जियालाल गड्रेल
मोर्शी : रवी गुल्हाने
शेंदूरजना घाट : मीना श्रीराम कोकाटे
वरूड : सुनील तुलराम

Local Body Elections : अखेरच्या दिवशी नाराजी, बंडखोरी अन् उमेदवारी अर्जांचा पाऊस

शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत असली तरी खरी लढत महाविकास आघाडीशीच होणार असल्याचेही अडसूळ यांनी स्पष्ट केले. महायुती अजूनही अस्तित्वात असल्याचा दावा करत, जिल्ह्यात ज्या ठिकाणी उमेदवार न दिला असेल, तेथे योग्य आणि सक्षम उमेदवाराला समर्थन देण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर महायुती पुन्हा एकत्र येण्याचे संकेतही अडसूळ यांनी दिल्याने आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.