Local Body Elections : जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेपकर्त्यांचे व मुख्याधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले; सहा आक्षेप मान्य

The District Collector heard the objections, six accepted : अकोट, मूर्तिजापूर नगरपरिषद व बार्शीटाकळी नगरपंचायतीच्या प्रभागरचनेवरील आक्षेपांची सुनावणी पूर्ण

Akola अकोट व मूर्तिजापूर नगरपरिषद तसेच बार्शीटाकळी नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभागरचनेवर दाखल झालेल्या २७ आक्षेपांवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सोमवार, ८ सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली. या वेळी आक्षेपकर्त्यांसह संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांचे (सीओ) म्हणणे ऐकून घेण्यात आले.

यामुळे जिल्ह्यातील पाच नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभागरचनेवरील आक्षेपांची सुनावणी पूर्ण झाली आहे. याआधी बाळापूर, तेल्हारा आणि हिवरखेड नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभागांवरील ३८ आक्षेपांवर ४ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली होती.

Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’ घोटाळा, ६१ हजार महिलांचे भवितव्य ठरणार आठवडाभरानंतर

सुनावणीतील आकडेवारी

अकोट नगरपरिषद : ३ आक्षेप

मूर्तिजापूर नगरपरिषद : ५ आक्षेप

बार्शीटाकळी नगरपंचायत : १९ आक्षेप

एकूण २७ आक्षेपांपैकी सहा आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले असून, संबंधित मुद्द्यांनुसार आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.

Education Department : शाळेत जायची सोय नाही, विद्यार्थ्यांनी अडवली एसटी!

जिल्ह्यातील अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा व हिवरखेड या पाच नगरपरिषदांसह बार्शीटाकळी नगरपंचायतीची प्रारूप प्रभागरचना यापूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यावर एकूण ६५ आक्षेप दाखल झाले होते. यातील सर्व आक्षेपांवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी पूर्ण केली असून, आता अंतिम प्रभागरचना निश्चित केली जाणार आहे.

“अकोट, मूर्तिजापूर नगरपरिषद आणि बार्शीटाकळी नगरपंचायतीच्या प्रभागरचनेसंदर्भात दाखल २७ आक्षेपांवर सुनावणी घेण्यात आली. त्यापैकी सहा आक्षेप मान्य करण्यात आले असून, त्यानुसार दुरुस्तीचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पाच नगरपरिषद व एक नगरपंचायतीची अंतिम प्रभागरचना येत्या ११ सप्टेंबरपर्यंत नगरविकास विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे,” असे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी म्हटले आहे.