The final draft of the constituency structure will be handed over : अमरावती जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचा अंतिम टप्प्याकडे प्रवास
Amravati जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. सोमवार, ११ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांकडून मतदारसंघ रचनेचा अंतिम मसुदा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे.
राज्य शासनाच्या वेळापत्रकानुसार मतदारसंघांचे प्रारूप जाहीर झाल्यानंतर १ ऑगस्ट रोजी त्यावरील आक्षेपांची सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या दालनात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडली.
यापूर्वीच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांचे प्रारूप विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द केले होते. त्यानंतर प्राप्त झालेल्या आक्षेप आणि सूचनांचा परामर्श घेण्यात आला.
Chandrashekhar Bawankule: वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ‘ॲक्शन मोड’मध्ये!
नव्या रचनेत चांदूर रेल्वे तालुक्यातील एक मतदारसंघ कमी झाला असून अचलपूर तालुक्यात एक मतदारसंघ वाढला आहे. मेळघाटातील दोन्ही तालुक्यांपैकी एका मतदारसंघाचा अपवाद वगळता इतर सर्व मतदारसंघांची नावे बदलण्यात आली आहेत.
इतर काही तालुक्यांमध्येही मोजक्या मतदारसंघांची नावे बदलली गेली आहेत. काही ठिकाणी जवळच्या गावांऐवजी दूरची गावे एखाद्या मतदारसंघात समाविष्ट केल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.
या तक्रारींवर सुनावणीअंती कोणता निर्णय झाला, हे विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर होणाऱ्या अंतिम मसुद्यातून स्पष्ट होणार आहे. हा मसुदा सार्वजनिक करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणखी एक आठवड्याचा अवधी आहे.
Prahar Janshakti Party : प्रहारच्या महिलांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना बांधल्या काळ्या राख्या!
जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांबाबत एकूण १८ तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या निर्णयाचे प्रतिबिंब जिल्हाधिकाऱ्यांना मिळणाऱ्या मसुद्यात उमटेल. नागरिकांना १८ ऑगस्टपर्यंत या अंतिम घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल.