The true strength of the alliance–front will be tested in the ZP election : जि.प. रणसंग्रामात खऱ्या युती-आघाडीचा कस लागणार!
Buldhana पालिका निवडणुकीत ‘स्वबळ’ आजमावताना एकमेकांसमोर उभे ठाकलेले महायुती व महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आता जिल्हा परिषद रणांगणात कोणती भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली दोस्तीत कुस्ती रंगणार की युती-आघाडी करून थेट मुकाबला दिला जाणार—याविषयी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा तापली आहे.
पालिका निवडणुकांमध्ये उघडकीस आलेल्या बोगस मतदारांच्या धुमाळीनंतर प्रशासनालाही आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ‘अलर्ट मोड’वर राहावे लागणार, हे निश्चित. जिल्हा परिषदेसाठी ६१ गट व पंचायत समित्यांच्या १२२ गणांचे आरक्षण नव्याने काढणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडून अपेक्षित पत्रव्यवहार अद्याप न झाल्याने आरक्षण प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला आहे. तरीही सर्वच पक्षांनी बूथस्तरावरची तयारी गतीने सुरू केली आहे.
Winter Session : सरकार अपयशाची कुंडली घेऊन अधिवेशनात आले आहे!
२१ डिसेंबरच्या नगरपालिका निवडणुकीचा निकाल ‘मिनी मंत्रालयात’ उमेदवार ठरवताना मोठा प्रभाव टाकणार असला, तरी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी पक्षांनी आत्तापासूनच आखली आहे. मनपा निकालानंतरच जि.प. निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२०१६-१७ च्या निवडणुकीत बुलढाणा जिल्हा परिषदेत ६० पैकी भाजपने २४, तर काँग्रेसने १४ जागा जिंकल्या होत्या. पंचायत समित्यांमध्येही दोन्ही पक्षांचेच वर्चस्व होते. युती किंवा आघाडी झाली तर ‘हक्काच्या जागा’ सहकारी पक्षाला सोडाव्या लागण्याची शक्यता असल्याने नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा डोक्यावर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष युती-आघाडी किती टिकेल, याविषयी प्रश्नचिन्ह कायम.
Sudhir Mungantiwar : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘प्रतिहेक्टरी वीस हजार बोनस’ जाहीर करा !
जिल्ह्यातील १६ लाख ६५ हजार ३४३ मतदारांमध्ये ८.०१ लाख महिला आणि ८.६३ लाख पुरुष असून, हेच मतदार ६१ जि.प. आणि १२२ पं.स. सदस्यांचे भविष्य ठरवणार आहेत.
पक्षीय बलाबल (२०१६-१७ आकडेवारी – थोडक्यात)
पक्ष जि.प. सदस्य पं.स. सदस्य
काँग्रेस 11 वर / 13 खाली 18 वर / 13 खाली
भाजप 06 वर / 24 खाली 15 वर / 24 खाली
शिवसेना (एकसंघ) 03 22
राष्ट्रवादी (एकसंघ) 11 11
मागील वेळी ओबीसीचे आरक्षण ५०.८१% असल्याने १६ पैकी एक गट जास्त मिळाला होता. नवीन आरक्षणानुसार ओबीसीचा एक गट कमी होण्याची शक्यता व्यक्त होते. मात्र, पक्षांच्या सध्याच्या तयारीवर याचा परिणाम मर्यादित राहील, असे सूत्रांचे मत. एकूण २००१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, चिखली व बुलढाण्यात प्रत्येकी २४४ (सर्वाधिक), तर शेगावमध्ये ८३ (सर्वात कमी) केंद्र आहेत. शेगावमध्ये जिल्ह्यातील किमान ३६,४९४ मतदार आहेत.
भाजपची स्थानिक पातळीवरील यंत्रणा वर्षभर सक्रिय असल्यामुळे ‘स्वतंत्र मोहीम’ उभारण्याची गरज नाही, अशी भूमिका भाजप नेत्यांची आहे. मित्रपक्षांबरोबर मैत्रीपूर्ण लढत ठेवून निकालानंतर समीकरणे जमवण्याची रणनीती भाजपकडून दिसते. दुसरीकडे काँग्रेसने इच्छुकांची अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, महाविकास आघाडीतही अंतर्गत चर्चेला वेग आला आहे. एकूण राजकीय वातावरण पाहता, मिनी मंत्रालयात ‘दोस्तीत कुस्ती’चे समीकरण अधिक गडद होताना दिसत आहे.








