Local Body Elections : महापालिका प्रभाग रचनेच्या प्रारूपावर १३३ आक्षेप

There are 133 objections to the draft of the municipal ward structure : १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान सुनावणी, २३ ला अंतिम प्रभाग रचना

Amravati महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याविरोधात मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. निश्चित मुदतीत एकूण १३३ आक्षेप जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले. आता या सर्व आक्षेपांवर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान सुनावणी होणार आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली आहे.

३ सप्टेंबर रोजी अमरावती महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आक्षेप व सूचना दाखल करण्यासाठी १५ सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत होती. या कालावधीत नागरिक, इच्छुक उमेदवार आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने एकूण १३३ आक्षेप नोंदविले.

Reservation control : बंजारा समाजाचा एल्गार, लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा

यामध्ये प्रमुख आक्षेप म्हणजे काही प्रभागातील भाग अनावश्यकरीत्या अन्य प्रभागांमध्ये जोडले गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच प्रारूप आराखड्यात प्रभाग निश्चित करताना राज्य व राष्ट्रीय महामार्ग, मोठे नाले, रेल्वे मार्ग आणि टेकड्या या नैसर्गिक व भौगोलिक सीमारेषा ओलांडल्या असल्याचा आरोप आक्षेपकर्त्यांनी केला आहे. हे नियमबाह्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अमरावती महापालिकेतील २२ प्रभागांची रचना कायम ठेवून नव्याने तयार केलेला प्रारूप आराखडा गेल्या ऑगस्ट महिन्यात प्रशासनाकडून तयार करण्यात आला होता. आयुक्तांच्या आदेशानुसार गठित करण्यात आलेल्या आठ सदस्यीय समितीने या प्रारूपावर सही करून त्यास मान्यता दिली आहे.

Puja khedkar : पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले, नोटीस फाडली !

आता १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान जिल्हाधिकारी येरेकर आक्षेपांची सुनावणी घेऊन त्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.