Tough Contest for the ‘Hot Seat’ in Khamgaon Municipal Council : खामगाव नगर परिषदेत ‘हॉटसीट’वर चुरस; उमेदवारांची कसोटी
Khamgao तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणारी यंदाची नगरपालिका निवडणूक राजकीयदृष्ट्या रंगतदार ठरणार असली तरी, कालावधीचा ताण उमेदवारांची झोप उडवणारा ठरत आहे. या निवडणुकीचा प्रचार कालावधी अवघा नऊ दिवसांचा, तर अपक्ष उमेदवारांसाठी फक्त पाच दिवसांचा असल्याने, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर आहे.
यंदा निवडणूक कार्यक्रम अत्यंत संक्षिप्त असल्याने, वातावरण निर्मिती आणि मतदारसंवादासाठी वेळच नाही, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. १० नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज दाखल होणार असून, २६ नोव्हेंबरला चिन्ह वाटप झाल्यानंतरच प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात होईल.
Harshwardhan Deshmukh : एकसंघ राहाल तरच टिकाल, हर्षवर्धन देशमुखांचा निशाणा कुणावर?
नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक गटबांधणी, प्रचारयोजना आणि मतदारसंवादाची तयारी करत आहेत. मात्र पक्षांकडून अधिकृत ग्रीन सिग्नल न मिळाल्याने बहुतेक जण *‘वेट अँड वॉच’*च्या भूमिकेत आहेत. अर्ज माघारीची मुदत २१ नोव्हेंबरला संपत असून, त्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी मिळणारा काळ फक्त ९ ते ५ दिवसांदरम्यान आहे.
या मर्यादित काळात घरोघर भेटी, प्रचारसभा आणि सोशल मीडियावरील मोहिमा यांचा समतोल राखत मतदारांपर्यंत पोहोचणे, हे उमेदवारांसाठी कठीण समीकरण ठरणार आहे. खामगाव नगर परिषदेतील नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या संभाव्य उमेदवारांची नावे जवळजवळ निश्चित केली असली, तरी अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. त्यामुळे शहरात “कोण होणार नगराध्यक्ष?” हा चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रचारासाठी वेळ कमी असला तरी, गाठीभेटी, सोशल मीडिया मोहिमा, आणि स्थानिक नेत्यांची शिफारस या पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. संभाव्य उमेदवारांचे समर्थक आपापल्या नेत्याला पुढे करण्यासाठी वातावरण निर्मितीचा प्रयत्न करत आहेत.
Cabinet meeting : 5व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला !
मात्र, पक्षचिन्ह न मिळाल्याने खुल्या प्रचाराची परवानगी नसल्याने सर्वजण संयम बाळगून आहेत. काळजीतले उमेदवार आणि उत्सुक मतदार अशा दुहेरी उत्सुकतेत खामगावची निवडणूक हॉटसीटवर विराजमान झाली आहे.








