Unity among the RPI factions in Amravati : बैठकीत झाला निर्णय, नव्या राजकीय समीकरणांची चाहूल
Amravati जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन गटांमध्ये ऐक्याची चळवळ वेग घेत आहे. दशकभरापासून वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेल्या रिपाइंच्या संघटनांनी यंदाच्या निवडणुकीत एकदिलाने लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
संघमित्रा मुलींच्या वसतिगृहात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. या घडामोडींमुळे जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे नेते ॲड. डॉ. पी. एस. खडसे होते. रिपब्लिकन पक्ष (खोरीपाचे) राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. गोपीचंद मेश्राम, मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर, रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विनायक दुधे यांची उपस्थिती होती.
Local Body Elections : अखेरच्या दिवशी नाराजी, बंडखोरी अन् उमेदवारी अर्जांचा पाऊस
गेल्या काही आठवड्यांपासून विविध रिपब्लिकन गटांमध्ये सतत चर्चा, समन्वय आणि विचारमंथन सुरू होते. मागील निवडणुकांतील पराभव, बहुजन मतांचे विभाजन आणि आंबेडकरी चळवळीला झालेल्या राजकीय नुकसानीचा गांभीर्याने घेत सर्व गट एकत्र येण्यास सहमत झाले. आता सामूहिक नेतृत्वाखाली एकत्र उभे राहून निवडणूक लढण्याच्या भूमिकेला या बैठकीत एकमुखी पाठिंबा मिळाला.
या निर्णयामुळे अनुसूचित जाती, जमाती आणि बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण झाल्याचे नेत्यांनी मत व्यक्त केले. स्थानिक पातळीवर उमेदवारांची चाचपणी करण्याचेही ठरले आहे. संयुक्त रिपब्लिकन आघाडीची भूमिका बुधवारी, १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पत्रकार परिषदेत अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे.
Local Body Elections : आमदारांच्या ‘सौ’, आई, भाऊ, वहिनी निवडणूक रिंगणात
बैठकीत बोलताना ॲड. डॉ. पी. एस. खडसे म्हणाले, “आपण एकत्र आलो तरच निवडणुकीत यशस्वी होऊ. संघटित होण्याशिवाय पर्याय नाही. रिपाइंच्या सर्व गटांनी संयुक्त आघाडीत सहभागी व्हावे. ऐक्याची भूमिका हेच सर्वांचे मत आहे आणि यात कोणीही विरोध करणार नाही.”








