Local Body Elections : पश्चिम विदर्भातील ४० नगरपरिषद, ५ नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान

Voting on Tuesday for 40 Municipal Councils and 5 Nagar Panchayats in West Vidarbha : सभांचा धडाका, घरोघरी जाऊन जनसंपर्काच्या मोहिमेला मिळाला वेग

Amravati पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांतील ४० नगरपरिषद व ५ नगरपंचायतींसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ४५ थेट नगराध्यक्ष पदांसह एकूण १,१२२ नगरसेवक पदांसाठी चुरस निर्माण झाली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांचा धडाका बघायला मिळाला. प्रचारासाठी एक दिवसाची वाढ मिळाल्याने उमेदवार आणि पक्षनेते मतदारांच्या घरोघरी जाऊन संपर्क मोहिमेला वेग मिळाला.

मागील तीन ते चार वर्षांपासून या सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये प्रशासक राज लागू आहे. दरम्यान, लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्याने स्थानिक स्तरावर राजकीय समीकरणे बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या गडाची पकड कायम ठेवण्याचे आव्हान प्रमुख राजकीय नेत्यांसमोर उभे आहे.

Navneet Rana : पुस्तक न बघता संविधानाचे एक कलम म्हणून दाखवा!

निवडणूक प्रक्रिया अवघ्या २९ दिवसांत पूर्ण करावयाची असल्याने प्रशासनावरही ताण वाढला आहे. अनेक ठिकाणी मुख्याधिकारी, तहसीलदार, एसडीओ, उपजिल्हाधिकारी यांची पदे रिक्त असल्याने निवडणूक व्यवस्थापनात पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Prakash Bharsakale : कोरोना काळात माझ्यासोबत काही तरी वाईट घडणार होते

जिल्हानिहाय निवडणूक तपशील

अमरावती जिल्हा : १० नगरपरिषद, २ नगरपंचायत
अकोला जिल्हा : ५ नगरपरिषद, १ नगरपंचायत
बुलढाणा जिल्हा : ११ नगरपरिषद
यवतमाळ जिल्हा : १० नगरपरिषद, १ नगरपंचायत
वाशिम जिल्हा : ४ नगरपरिषद, १ नगरपंचायत