व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Prakash Bharsakale : कोरोना काळात माझ्यासोबत काही तरी वाईट घडणार होते

Prakash Bharsakale : कोरोना काळात माझ्यासोबत काही तरी वाईट घडणार होते

conspiracy was planned against me during the COVID period, reveals the MLA : आमदार प्रकाश भारसाकळे यांचा गौप्यस्फोट, निशाणा कुणाकडे?

Akola अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. “कोरोना काळात काही लोकांना मी मरावे असे वाटत होते,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. कोरोनाच्या उपचारादरम्यान त्यांचे अन्न बंद झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी ‘दाल में कुछ काला है’ असा संशय व्यक्त केला होता, असेही ते म्हणाले.

“अकोल्यात उपचार योग्य होत नसल्याने पत्नी मला नागपूरला हलवण्याचा आग्रह करत होती, पण जनतेच्या आशीर्वादामुळे मी बरा झालो,” असे ते म्हणाले. या सभेत नवनीत राणाही उपस्थित होत्या.

Local Body Elections : नगरसेवक पदाच्या उमेदवार अपघातात ठार!

भारसाकळे सध्या अकोटचे आमदार असून, मूळचे दर्यापूर (जि. अमरावती) येथील रहिवासी आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले जाण्याची चर्चा होती आणि त्यांची घोषणा उशिरा झाली होती. “मतदारसंघ महिला राखीव होईपर्यंत मी अकोटची भूमी सोडणार नाही,” असे सांगत त्यांनी पुढील निवडणुकीतही आपणच उमेदवार असू, असा संकेत आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना दिल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.

Maharashtra politics : चर्चा झाली आहे, काही गोष्टी ठरल्या आहेत

अकोट विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले प्रकाश भारताकडे यांनी त्यापूर्वी दर्यापूर मतदार संघातून पाच वेळा विजय मिळवला होता. आता नगरपालिका निवडणुकीत दर्यापूर येथे त्यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात आहेत.

error: Content is protected !!