Local Body Elections : प्रभाग रचना ‘जैसे थे’; काहींना दिलासा, काहींना धाकधूक!

Ward structure as it is; relief to some, some are in fear : अकोला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी

Akola जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने शुक्रवारी विभागीय आयुक्तांनी प्रभाग रचना अंतिम केली. प्रभाग रचनेत कोणताही मोठा बदल न झाल्याने रचना ‘जैसे थे’ राहिली आहे. त्यामुळे काहींना राजकीय दिलासा तर काहींची धाकधूक वाढली आहे. आता सर्वांचे लक्ष आरक्षण प्रक्रियेवर केंद्रीत झाले असून, त्यानंतर राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या एकूण ५२ सर्कल्स (मतदारसंघ) आहेत. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर आता आरक्षण ठरवले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी ओबीसी आरक्षणावरील याचिकेवर निर्णय दिल्यानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला.

Local Body Elections : प्रभाग रचना अंतिम; दोन आक्षेप मान्य, १६ फेटाळले

यानंतर प्रभाग रचनेचा प्राथमिक आराखडा जाहीर करण्यात आला होता. त्यावर आक्षेप व हरकती मागवण्यात आल्या. या हरकती संबंधित तहसील कार्यालयांमध्ये दाखल झाल्या. जिल्हा प्रशासनाने सुनावणी पूर्ण करून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला.

जिल्ह्यातील ५२ सर्कल्ससाठी एकूण ३२ हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकतींवर विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी झाली होती. सुधारित तरतुदीनुसार अंतिम निर्णय देण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. त्यानुसार २२ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना निश्चित करण्यात आली.

Sajid Khan Pathan : कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना आमदारांचा सज्जड दम

अंतिम प्रभाग रचनेनंतर इच्छुक उमेदवार आता आपल्या सोयीनुसार कोणत्या सर्कलमध्ये कोणती गावे आहेत, हक्काचे मतदार किती आहेत, याचे गणित मांडत आहेत. काही विद्यमान सदस्यांच्या मूळ गावांचा समावेश त्यांच्या सर्कलमध्ये झाल्याने त्यांना फायदा होणार आहे, अशी चर्चा आहे.

प्रभाग रचनेत काय आहे?

तेल्हारा तालुका : ७ मतदारसंघ
अकोट तालुका : ८ मतदारसंघ
मूर्तिजापूर तालुका : ७ मतदारसंघ
अकोला तालुका : १० मतदारसंघ
बाळापूर तालुका : ७ मतदारसंघ
बार्शीटाकळी तालुका : ७ मतदारसंघ
पातूर तालुका : ६ मतदारसंघ

Marbat 2025 : महागाई, भ्रष्टाचारावर प्रहार; डोनाल्ड ट्रम्पचाही बडगा !

वंचित बहुजन आघाडी : मागील सत्ता काळात वंचितकडे सर्वाधिक २९ सदस्य होते. काही दिवसांपूर्वी काँग्रेस, प्रहार आणि शिवसेनेतील काही सदस्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त आहे.

शिवसेना (ठाकरे गट) : पूर्वी १२ सदस्य होते; त्यातील तीन शिंदे गटात गेले. आता ठाकरे गटासमोर सदस्यसंख्या वाढवण्याचे आव्हान आहे. शिंदे गटासाठी ही पहिली निवडणूक असल्याने आपले अस्तित्व दाखवण्याची संधी आहे.

काँग्रेस : पाचपैकी दोन सदस्य वंचितमध्ये गेले. आता पक्षासमोर किमान दोन अंकी सदस्यसंख्या राखण्यासाठी रणनीती आखण्याचे आव्हान आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवार व अजित पवार गटांसाठी फुटीनंतरची पहिली निवडणूक. अजित गट सत्तेत, शरद गट विरोधात – त्यामुळे दोघांनाही आपले अस्तित्व सिद्ध करावे लागेल.

भाजप : सभापती निवडणुकीत दोन सदस्य फुटल्याने भाजपकडे फक्त तीन सदस्य उरले होते. आता भाजप स्वतंत्र लढणार का, की महायुतीसोबत, याकडे लक्ष आहे.