Local Body Elections : ‘हॉटस्पॉट’ चिखलीत वाढीव मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर?

Who will benefit from the higher voter turnout? : निकाल लांबणीवर पडल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली

Chikhali जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि ‘हायप्रोफाईल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली नगरपालिका निवडणुकीत यंदा तब्बल ७१.०२ टक्के मतदान झाले. गतवेळेपेक्षा १.७५ टक्के वाढ झाल्याने हा वाढीव मतदानाचा टक्का नेमका कोणाच्या पारड्यात जाऊन पडतो, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्व राजकीय वर्तुळांत शिगेला पोहोचली आहे. त्यातच मतदानादरम्यानच “निकाल लांबणार” अशी बातमी पसरताच उमेदवारांचे धाबे दणाणले आणि शहरभर उलटसुलट चर्चांचे पेव फुटले.

चिखली पालिकेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अ.प. शिंदेसेना आघाडी) यांच्यात अत्यंत चुरशीची तिरंगी लढत आहे. तिन्ही पॅनेल तगडे असल्याने निकाल कोणाच्या बाजूने झुकतो हे भाकीत करणे कठीण झाले आहे. त्यात बसपा, वंचित आणि अपक्ष उमेदवारही रिंगणात असल्याने नगराध्यक्षपदाची शर्यत आणखी रंगतदार झाली आहे.

Azad Hind Sanghatna : बुलढाण्यात बोगस मतदान रॅकेट; ‘मुख्य सूत्रधार’ कोण?

 

मतदानाची टप्प्याटप्प्याने वाढ

पहिले दोन तास (7 ते 9) – फक्त 5.81% मतदान

दुपारी 3.30 पर्यंत – 43.37%

संध्याकाळी 7.30 पर्यंत अखेरचा ‘स्पर्ट’ – एकूण 71.02% मतदान

शहरातील शेवटच्या चार तासांत मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात.

Local Body Elections : मतदानाची टक्केवारी कोणाची ‘समिकरणे’ बिघडवणार?

गतवेळच्या तुलनेत मतदान काय बदलले?

सन 2016:

एकूण मतदार – 49,514

मतदान – 34,310

टक्केवारी – 69.29%

यंदा 2024:

एकूण मतदार – 56,068

मतदान – 39,822

टक्केवारी – 71.02%

एकूण 5,512 मते वाढली

Vidarbha Farmers : सेनगावमध्ये शेतकरी नेत्यावर ‘खोटे गुन्हे’?

 

ही वाढलेली मते ‘किंगमेकर’ ठरू शकतात आणि निकालाचे समीकरण पूर्णपणे बदलू शकतात.

मतदानादरम्यानच निकाल पुढे ढकलला जाणार अशी माहिती समोर आल्यानंतर चिखलीतील राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची धाकधूक वाढली असून, सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क रंगू लागले आहेत. मतदान वाढणे म्हणजे जनतेचा असलेला नाराजीचा संकेत, विकासाचा मुद्दा की स्थानिक समीकरणांचा परिणाम? याची उत्तरे 21 डिसेंबर रोजी निकाल लागेपर्यंत मिळणार नाहीत.