Local Body Elections : ३५ टक्के ‘लाडक्या बहिणी’ घराबाहेर पडल्याच नाहीत

Women’s turnout remains far from 35 percent : महायुतीचे घटक पक्ष चिंताग्रस्त, महिला मतदानापासून लांबच

Amravati जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद व दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीत यंदा प्रथमच पुरुषांच्या तुलनेत तब्बल १३०१ महिला मतदार अधिक नोंदले गेले. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी हा कल उलटला. मंगळवारी झालेल्या मतदानात पुरुषांचे मतदान ७१.६६ टक्के झाले, तर महिलांची मतदानाची टक्केवारी ६५.१३ वर स्थिरावली. निर्णायक मतदारसंख्या असूनही महिलांच्या कमी सहभागामुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या महिला मतदारांच्या बळावर महायुतील घटक पक्षांनी यश मिळवले होते, त्याच पक्षांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिला मतदारांच्या घटलेल्या मतदानामुळे चिंता लागली आहे.

जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या मतदारयादीत महिला मतदार आधिक्य असल्याने यावेळी स्त्रीशक्तीची निर्णायक भूमिका राहणार, अशी चर्चा मतदानापूर्वी होती. परंतु प्रत्यक्ष मतदानात एकाही पालिकेत महिलांची मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा जास्त नव्हती. एकूण ५४,६९३ म्हणजेच जवळपास ३५ टक्के महिलांनी मतदान प्रक्रियेपासून दूर राहिल्याचे समोर आले. त्यामुळे मोठ्या संख्येने मतदान टाळणाऱ्या ‘लाडक्या बहिणी’ंचा फटका कोणाला बसेल, याची उत्सुकता वाढली आहे.

Local Body Elections : चिखलदऱ्याच्या निवडणुकीत अकोल्याहून ‘रसद’ पुरवणारा बिल्डर चर्चेत

मतदानाचा दिवस उजाडल्यानंतर महिलांच्या अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसादाने उमेदवारांसह प्रशासनालाही धक्का बसला आहे. महिलांचा सहभाग कमी का राहिला, यावर विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे.

मतदान स्थिती (सुधारित तक्ता)

पालिका / नगरपंचायत पुरुष मतदान (%) महिला मतदान (%)

अचलपूर 69.73 –
वरुड 64.07 –
दर्यापूर 68.66 –
मोर्शी 65.78 –
चिखलदरा 86.56 83.99
शेंदुरजन (घ) 73.53 –
चांदूर रेल्वे 68.49 –
चांदूर बाजार 67.13 –
धामणगाव 67.21 –
धारणी – 60.47
नांदगाव 73.30 –
एकूण 71.66 65.13

निवडणुकीत चिखलदरा नगरपरिषदेत सर्वाधिक ८३.९९ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. धारणीतील महिला मतदान सर्वांत कमी म्हणजे ६०.४७ टक्के राहिले. पुरुषांमध्येही चिखलदरात सर्वाधिक ८६.५६ टक्के मतदान झाले असून वरुड येथे सर्वात कमी ६५.८४ टक्के मतदान नोंदले गेले.

Vidarbha Farmers : शेतकरी नेत्यांवरील चुकीचे गुन्हे रद्द करा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शासनाने महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. यावेळी सहा नगरपरिषदांत महिला मतदारसंख्या पुरुषांपेक्षा जास्त असतानाही उमेदवारीत महिलांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बहुतेक पक्षांनी महिलांना फक्त राखीव जागांवरच उमेदवारी दिली, तर खुल्या जागांवर पुरुष उमेदवारांचेच वर्चस्व राहिले.