162 nominations filed for corporator posts, and 16 nominations filed for the post of mayor : बुलढाणा जिल्ह्यात निवडणुकीची धामधूम; नामांकन प्रक्रिया अंतिम टप्प्यात
Buldhana नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५साठी नामांकन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज पाचव्या दिवशी जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमधून नगराध्यक्ष पदासाठी १० तर नगरसेवक पदासाठी १३० अर्ज दाखल झाले.
दरम्यान, १० नोव्हेंबर ते आजपर्यंतच्या पाच दिवसांत नगराध्यक्ष पदासाठी एकूण १६ तर नगरसेवक पदासाठी एकूण १६२ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
Bihar CM : भाजप जेडीयू च्या यशानंतर एकच प्रश्न बिहारचा मुख्यमंत्री कोण?
नगराध्यक्ष पदासाठी दाखल अर्ज (शहरनिहाय)
बुलढाणा – ०
चिखली – २
देऊळगाव राजा – १
जळगाव जामोद – ०
खामगाव – १
लोणार – १
मलकापूर – ०
मेहकर – १०
नांदुरा – १
शेगाव – ०
सिंदखेडराजा – ०
नगरसेवक पदासाठी दाखल अर्ज (शहरनिहाय)
बुलढाणा – १६
चिखली – ३१
देऊळगाव राजा – ३
जळगाव जामोद – ६
खामगाव – १
लोणार – ७
मलकापूर – १२
मेहकर – ६०
नांदुरा – १
शेगाव – २०
सिंदखेडराजा – ५
Maharashtra politics : बिहार निकालाच्या धामधुमीत महाराष्ट्रात अचानक राजकीय हालचाल !
निवडणूक आयोगानुसार, शनिवार १५ नोव्हेंबर रोजीही नामांकन प्रक्रिया सुरू राहणार असून १७ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर १८ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.








