Local Body Elections : न. प. निवडणुकीत मतदारांची उघड नाराजी

182 voters opt for NOTA in Buldhana : बुलढाण्यात १८२ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला

Buldhana जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्ये मतदारांचा उत्साह दिसून आला असला, तरी काही ठिकाणी उमेदवारांविषयी असंतोषही ठळकपणे समोर आला आहे. याचे स्पष्ट प्रतिबिंब म्हणजे ‘नोटा’ (None of the Above) या पर्यायाला मिळालेली पसंती.

बुलढाणा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तब्बल १८२ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडत आपली नाराजी नोंदवली. याशिवाय नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही काही मतदारांनी नोटाला मतदान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे, महिला व मागासवर्गीय आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच एकाच प्रभागातून अधिक प्रतिनिधी निवडण्याची सुविधा मिळावी, यासाठी प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.

Local Body Elections : स्वीकृत नगरसेवकपदी भूषण व संतोष मापारींची दाट शक्यता

 

इव्हीएम मशीनशी छेडछाड किंवा नियमबाह्य कृती झाल्यासच मतदान अवैध ठरते. अन्यथा नोटा बटण दाबले तरी ते वैध मतदान मानले जाते. मतदाराला इच्छेनुसार मतदान करण्याचा अधिकार आहे. एखाद्या मतदाराला तीनच उमेदवार पसंत असतील, तर तो तीन वेळा मतदान करून थांबू शकतो. उर्वरित उमेदवार पसंत नसतील, तर ‘नोटा’ बटण दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करता येते.

Shegao Municipal Council : शेगाव नगरपरिषदेत ‘स्वीकृत’ जागांसाठी राजकीय हालचालींना वेग; ३ पदांसाठी ६ इच्छुक मैदानात

नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुकांमध्ये नोटाचा वापर झाल्याने, काही मतदार विद्यमान उमेदवारांवर नाराज असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राजकीय पक्षांनी याची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. एकूणच, बुलढाणा नगरपरिषदेच्या निवडणुकीत ‘नोटा’ हा पर्याय केवळ बटणापुरता न राहता, मतदारांच्या असंतोषाचा आवाज ठरला आहे.