‘Batting line change’ in Congress: Harshvardhan Sapkal expels second-tier workers : ‘स्थानिक’साठी नव्या दमाच्या नेतृत्वाला पुढे आणण्याचे प्रयत्न
Buldhana : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीकेट या खेळामध्ये एखाद्या संघाला सातत्याने अपयश येत असल्यास बॅटींग लाईन चेंज केली जाते. काँग्रेसनेही आता हेच सूत्र स्वीकारल्याचे दिसत आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राज्याचा कर्णधार बदलण्यात आला. ज्या धडाकेबाज नाना पटोलेंनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिले, त्यांना विधानसभा निवडणुकीत मात्र अपयश आले. त्यानंतर शिर्षस्थ नेत्यांनी राज्याचा कर्णधार बदलवला आणि पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांना आणले. सपकाळांनी आता जिंकण्यासाठी जिल्ह्यांतील बॅटींग लाईन चेंज करणे सुरू केले आहे. याची सुरूवात त्यांना आपला गृहजिल्हा बुलढाण्यातून केली.
राज्यातील काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वात झालेले बदल आता जिल्हास्तरावर संघटनात्मक पातळीवरही उमटताना दिसत आहेत. प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसने नव्या दमाच्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही प्रमुख नेत्यांनी अलीकडच्या काळात काँग्रेसला रामराम ठोकत इतर पक्षांत प्रवेश केल्यामुळे पक्ष संघटना कमकुवत झाली होती. खामगावचे माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेशाबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसने नवा सूर पकडत दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहीणींमुळे राज्य संकटात, शिंदेंच्या आमदाराचा प्रहार !
नवे विधानसभा समन्वयक नेमले..
संघटनेला पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टीने चार विधानसभा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या आदेशावरून काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष गणेशराव पाटील यांनी यांची घोषणा केली. खामगाव : ज्ञानेश्वर पाटील, मेहकर : देवानंद पवार, चिखली : प्रा. डॉ. राजू गवई, सिंदखेडराजा : अशोक पडघान या नियुक्त्या संघटनेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असून, अनेक वर्षांनंतर हे पद सक्रिय करण्यात आले आहे.
ब्लॉक अध्यक्षपदांवर नव्या चेहऱ्यांची वर्णी..
पक्षाने जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागांमध्ये पुढीलप्रमाणे नव्या ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती केली आहे : खामगाव ग्रामीण : तेजेंद्रसिंह चौव्हाण, खामगाव शहर : स्वप्निल ठाकरे, शेगाव शहर : कैलास देशमुख, शेगाव ग्रामीण : ज्ञानेश्वर शेजोळे, जळगाव जामोद ग्रामीण : अॅड. भाऊराव भालेराव, संग्रामपूर ग्रामीण : सतीश टाकळकर, मेहकर ग्रामीण : प्रदीप देशमुख, मोताळा ग्रामीण : प्रवीण कदम, मलकापूर ग्रामीण : अनिल भारंबे, लोणार ग्रामीण : आश्रू फुके, देऊळगाव राजा ग्रामीण : रामदास डोईफोडे, देऊळगाव राजा शहर : आतिष कासारे.
International Diabetes Conference : मुख्यमंत्री बनले डॉक्टर, दिल्या मधुमेह टाळण्याच्या टीप्स !
लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन झाल्यानंतर काँग्रेस आता विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत करत आहे. संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी सुरू झालेली ही पुनर्रचना निवडणुकीच्या रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले, “नवीन नियुक्त्यांमुळे जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक रचना बळकट होईल. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी दिल्याने आगामी निवडणुकांत चांगले यश मिळवण्याचा आत्मविश्वास वाढेल.” राजकीयदृष्ट्या काँग्रेसने आगामी संघर्षासाठी कंबर कसल्याचे स्पष्ट होत आहे.








