Explosion of rebellion Internal strife in all parties has disrupted the election math : जुन्यांना डावलून आयारामांची एन्ट्री, कार्यकर्त्यांची नाराजी, लोकशाहीच्या अमूल्य मतांचे धिंडवडे उडण्याची भीती
Nagpur : निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक पक्षात तणाव, मनसुबे, नाराजी आणि आरोपांचे धुरळे उठतात. मात्र यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी शिगेला पोहोचली असून नेत्यांसमोर स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच आवरण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ‘कार्यकर्तेच नेते झाले, आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांना पटवायचे कोणत्या तोंडाने, असा प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित होताना दिसतो.
भाजपसह महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांमध्ये उमेदवारी वाटप हा सर्वात मोठा स्फोटक मुद्दा ठरला. विशेषतः जुन्या-जाणत्या नेत्यांकडे दुर्लक्ष करून आयारामांना उमेदवारी देण्याच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या नाराजीतून काहींनी अपक्ष उमेदवारी, तर काहींनी पाडापाडीचे राजकारण करण्याची तयारी सुरू केली आहे. काही ठिकाणी तर कार्यकर्त्यांना वेळोवेळी धोबीपछाड बसल्याची भावना असल्याने ते पक्षश्रेष्ठींसोबतही थेट भिडण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत.
Bhushan Gavai : मी मूळतः धर्मनिरपेक्ष; आंबेडकर, राज्यघटनेमुळेच आज या पदावर !
पारदर्शी प्रक्रियेची घोषणाच फोल..
प्रत्येक पक्ष पारदर्शी उमेदवारी प्रक्रिया राबवण्याचा गाजावाजा करत असला तरी प्रत्यक्षात कार्यकर्त्यांचा विश्वास ढळलेला आहे. पैसे कोण वाटणार? कोणाचा पॅनेल अंतिम, याकडेच अनेकांचे लक्ष लागल्याने मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता ही फक्त घोषणांपुरती राहण्याची भीती बळावत आहे.
एकमेकांविरोधात कसली कंबर..
पक्षातील अंतर्गत भांडणे, गटबाजी आणि ‘तुम्ही-आम्ही’च्या खिंडारामुळे बंडखोरी वाढत चालली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख दोन्ही आघाड्यांत महायूती आणि महाविकास आघाडीतील फूट अधिकच गडद होऊ लागली आहे. ज्यांना तिकीट नाकारले, त्यांनी थेट प्रतिस्पर्धी पक्षांची वाट धरली, तर काहींनी अपक्ष म्हणून प्रवेश करून मूळ पक्षाची समीकरणेच ढवळून काढली.
Local body election : धक्कादायक प्रकार; 1 कोटीत नगरसेवक पदाचा लिलाव?
लोकशाहीच्या मतांचे धिंडवडे उडणार?
या सर्व राजकीय सैराटात खरा तोटा होणार आहे तो अमूल्य मतांचा. गटबाजी, बंडखोरी आणि उमेदवारीवरील कलहामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. विरोधक नव्हे, तर स्वतःच्या पक्षातील बंडखोरांनीच मुख्य लढाई उध्वस्त करण्याची परिस्थिती निर्माण केली आहे. या अस्वस्थ करणाऱ्या राजकीय वातावरणामुळे लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली जातील, अशी भीती राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. निवडणूक जिंकण्याची स्पर्धा आता विकासावरून न सरता कोण किती गटबाजी करतो, कोण पक्षाला किती तडे देतो, या दिशेने सरकत असल्याचे चिंतेचे चित्र या सर्व घटनांमधून स्पष्ट दिसते आहे.








