Local Body Elections : महानगरपालिकेत ‘महिलाराज’; आरक्षणाने काहींना ‘दे धक्का’

Out of 87 Seats, as Many as 44 Reserved for Women : ८७ पैकी तब्बल ४४ जागा महिलांसाठी राखीव, राजकीय गणीत बिघडणार?

Amravati आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण जाहीर झाले असून, महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवल्याने ‘महिलाराज’ आले आहे. मात्र, या आरक्षणामुळे काहींना ‘दे धक्का’ बसल्याचे चित्र दिसत आहे.

आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी १५, अनुसूचित जमातींसाठी २, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २३, तर उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. विशेष म्हणजे, एकूण ८७ जागांपैकी तब्बल ४४ जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत.

अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२ प्रभागांपैकी २१ प्रभागांत प्रत्येकी चार जागा आणि एका प्रभागात तीन जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. ही सोडत आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली.

Akola Airport : अकोला विमानतळाचे ‘टेकऑफ’, विशेषाधिकार समितीचा निर्णय

आरक्षणाची चिठ्ठी काढण्याचे काम जेवड येथील महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी विरा हनवते, मसिरा शेर खान, सम्यक कटकतलवारे, ईश्वरी कराळे आणि युवराज मते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, सहायक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महानगरपालिका निवडणूक होणार असल्याने शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. आरक्षण निश्चित झाल्याने आता इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. मतदारसंघनिहाय समीकरणे पाहता अनेक जण मतदारांशी संपर्क मोहिमेला सुरुवात करणार आहेत. या आरक्षणामुळे काही दिग्गजांना मोठा फटका बसलेला नाही; मात्र काही माजी नगरसेवकांना शेजारच्या प्रभागात स्थलांतर करावे लागण्याची शक्यता आहे.

२२ पैकी २१ प्रभागांत एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने अनेक नेत्यांना दिलासा मिळाला आहे. तथापि, माजी महापौर अशोक डोंगरे आणि काँग्रेसचे नीलेश गुहे यांना प्रभाग ९ (एसआरपीएफ-वडाळी) येथे सर्वसाधारण जागा न मिळाल्याने निराशा व्यक्त केली जात आहे.

Weather update : विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी !

प्रभाग १२ (स्वामी विवेकानंद कॉलनी-बेलपुरा) येथे बंडू हिवसे आणि चेतन पवार आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत, तर प्रभाग १ (शेगाव-रहाटगाव) मध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण निघाल्याने विजय वानखडे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.