Reservation process for Sarpanch elections : २३ व २४ एप्रिलला प्रक्रिया; थेट जनतेतून सरपंच निवडणार
Amravati जिल्ह्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत २३ आणि २४ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी सर्व संबंधित नागरिकांनी आपल्या तहसील कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
आरक्षण सोडतीची ही प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमध्ये तालुकास्तरावर पार पडणार आहे. यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून संबंधित तहसीलदार नियुक्त करण्यात आले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येईल.
Nanded Politics : नांदेडमध्ये अशोकराव – प्रतापराव संघर्ष शिगेला !
सर्व तहसील कार्यालयांतील सभागृहांमध्ये ही प्रक्रिया पार पडेल. संबंधित उपविभागीय अधिकारी हे नियंत्रण अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी ग्रामपंचायत सदस्य, इच्छुक नागरिक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Chandrashekhar Bawankule : सामनातील अग्रलेख उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठीच !
सोडत प्रक्रिया वेळापत्रक:
२३ एप्रिल २०२५ रोजी – दुपारी १२ वाजता
अमरावती – तहसीलदार कार्यालय, अमरावती
भातकुली – तहसीलदार कार्यालय, भातकुली
चांदूर रेल्वे – तहसीलदार कार्यालय, चांदूर रेल्वे
दर्यापूर – तहसीलदार कार्यालय, दर्यापूर
अचलपूर – तहसीलदार कार्यालय, अचलपूर
धारणी – तहसीलदार कार्यालय, धारणी
मोर्शी – तहसीलदार कार्यालय, मोर्शी
२४ एप्रिल २०२५ रोजी – दुपारी १२ वाजता
नांदगाव खंडेश्वर – तहसीलदार कार्यालय, नांदगाव खंडेश्वर
तिवसा – तहसीलदार कार्यालय, तिवसा
धामणगाव रेल्वे – तहसीलदार कार्यालय, धामणगाव रेल्वे
वरूड – तहसीलदार कार्यालय, वरूड
अंजनगाव सुर्जी – तहसीलदार कार्यालय, अंजनगाव सुर्जी
चांदूर बाजार – तहसीलदार कार्यालय, चांदूर बाजार
चिखलदरा – तहसीलदार कार्यालय, चिखलदरा