Shingne and Khedekar come together for the election : देऊळगाव राजाच्या राजकारणात भूकंप, सत्ताबदलाच्या चर्चांना वेग
Deulgao raja विधानसभा निवडणुकीत एकमेकांना आव्हान देणारे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे आणि शशिकांत खेडेकर यांनी देऊळगाव राजा नगर पालिकेसाठी युती केल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.या युतीमुळे राजकारनात खळबळ उडाली असून आमदार मनोज कायंदे यांचे वाढत असलेल्या वर्चस्व कमी करण्यासाठी ही खेळी असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर दोन्ही प्रभावी राजकीय घराण्यांनी मतभेद बाजूला ठेवत आगामी नगरपालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय जाहीर केल्याने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
११ नोव्हेंबर रोजी माध्यमांनी व्यक्त केलेले भाकीत खरे ठरत दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले. डॉ. शिंगणे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “नगरपालिकेत झेंडा फडकवायचा असेल तर दांडा आणि झेंडा एकच असला पाहिजे. नगर विकास आघाडीचाच झेंडा फडकणार, याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे.” त्यावर डॉ. खेडेकर यांनी म्हणाले, “जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत असून आमचे सर्व उमेदवार विजयी होतील.”
Local Body Elections : उमेदवारांची ‘विकासपत्रिका’ अनिवार्य; मुद्दा 15-ब न भरल्यास उमेदवारी धोक्यात!
पत्रकार परिषदेत उमेदवारांची निवड, वॉर्डनिहाय रणनीती, आघाडीचे नेतृत्व यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा रंगली. उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वीच शहरात कोण कुठे लढणार यावर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
“सत्ताधारी आमदारांच्या विरोधात का?” या प्रश्नावर दोन्ही नेत्यांनी एकमताने उत्तर दिले, “आम्ही कोणाच्या विरोधात नाही. शहराच्या विकासासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. नगर विकास आघाडीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत.”
शिंगणे–खेडेकर यांच्या एकत्र येण्यामुळे निवडणुकीत समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांचा एकत्रित जनाधार प्रचंड असल्याने सत्ताधारी गट अडचणीत येऊ शकतो, असे जाणकारांच्या चर्चांमधून समोर येत आहे. बंददरवाजा बैठका, वाढता असंतोष आणि मागील आठवड्यांतील राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही आघाडी शहराच्या राजकारणातील मोठा गेम चेंजर ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Local Body Elections : नगरपालिका कार्यालयांत झुंबड, उमेदवारांमधील संभ्रम कायम
या घोषणेनंतर देऊळगावराजा शहरात प्रत्यक्ष राजकीय भूकंप झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत असून आगामी नगरपरिषद निवडणुकीची लढत अधिक चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे.








