Local Body Elections : मुख्यमंत्र्यांचे थेट लक्ष, चिखलदऱ्यात राजकीय भूकंप!

The Chief Minister’s political move altered the equations in Chikhaldara : रवी राणांची खेळी आणि राजेंद्रसिंह सोमवंशींचा भाजप प्रवेश

Amravati राज्यातील सर्वात लहान नगरपालिकेचा दर्जा असलेल्या चिखलदऱ्यात शुक्रवारी अनपेक्षित घडामोड झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी भाजपात प्रवेश करताच संपूर्ण राजकीय गणित बदलले. स्थानिक राजकारणात प्रभावी मानल्या जाणाऱ्या सोमवंशींचा प्रवेश हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राणा दाम्पत्याच्या ‘स्पेशल फॉलोअप’चा परिणाम असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

राजेंद्रसिंह सोमवंशी यांची राजकीय कारकीर्द १९९२ मध्ये नगरसेवक म्हणून सुरू झाली. सलग २५ वर्षे नगरसेवक ते तीन कार्यकाळ नगराध्यक्ष, तर मागील पाच वर्षांत पत्नी विजया सोमवंशी नगराध्यक्ष — असे घराण्याचे चिखलदऱ्यातील वर्चस्व राहिले आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष या तिन्ही पद्धतींनी निवडणुका लढवलेल्या सोमवंशी यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करून ‘‘जोर का झटका धीरे से’’ देत प्रतिस्पर्ध्यांना धक्का दिला.

Local Body Elections : महायुतीत एकजूट की वेगळीच राजकीय चाल?

महालोका आणि महायुतीतील बैठकीत चिखलदऱ्यासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारीची चर्चा सुरू होती. मात्र, भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यास मतविभाजनाचा धोका वाढेल, हे लक्षात आल्यानंतर आ. केवलराम काळे, जिल्हाध्यक्ष प्रभूदास भिलावेकर, आणि राणा दाम्पत्याने वरिष्ठ पातळीवर सोमवंशींच्या प्रवेशासाठी जोर लावल्याचे सूत्रांनी सांगितले. अखेरीस त्यांना भाजपात दाखल करून महायुतीतील समीकरण स्पष्ट करण्यात आले.

चिखलदरा व धारणी परिसराच्या विकासात सत्ताधाऱ्यांतील विसंवाद अडथळा ठरत होता, असा थेट आरोप सोमवंशी यांनी केला. ते म्हणाले— “मुख्यमंत्री भाजपचे आणि आमदारही भाजपचे असल्याने गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल. पर्यटन वाढीसाठी हा निर्णय सहकारी सदस्यांच्या आग्रहावर घेतला.”

चिखलदऱ्यातील कलोती कुटुंबाशी असलेले जुने संबंध, तसेच अंध विद्यालयाच्या कारभारातून निर्माण झालेली जिव्हाळ्याची नाळ यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बालपण चिखलदऱ्याशी जोडलेले आहे. त्यामुळे

Local Body Elections : ओबीसी–सर्वसाधारण गटातील महिलांसाठी नवी सोडत!

पर्यटन प्रकल्प, पायाभूत सुविधा, जंगल पर्यटन विकास, यांसाठी त्यांनी स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. नगराध्यक्ष भाजपचा असावा, यासाठी त्यांनीही इच्छुकता दर्शवल्याचे सांगितले जाते.

बडनेराचे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी चिखलदरा–धारणी विकासासाठी गेले काही महिने पाठपुरावा वाढवला आहे. सोमवंशींचा भाजप प्रवेश हा त्यांचा रणनीतीचा महत्वाचा भाग मानला जात आहे.