Women’s reservation leads to disappointment among aspirants : निवडणुकीच्या रिंगणात महिला नेत्यांची होणार गर्दी
Amravati जिल्हा परिषद अध्यक्षपद तसेच पंचायत समिती सभापतीपदांच्या आरक्षणाबाबतची अधिसूचना ग्रामविकास विभागाने शुक्रवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गात राहणार आहे. दरम्यान, मेळघाटातील दोन्ही पंचायत समिती सभापतीपदे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठरविण्यात आली असून, अन्य १२ पंचायत समिती सभापतीपदांचेही आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. परंतु, महिला आरक्षणामुळे अनेक इच्छुकांनी तलवारी म्यान करण्याची वेळ आली आहे. अशात या आरक्षणामुळे संमीश्र भावना राजकीय पक्षांमध्ये बघायला मिळत आहेत.
निवडणूक प्रक्रियेची पूर्वतयारी प्रशासनाकडून सुरू असून, ५९ गट आणि ११८ गणांची प्रभागरचना पूर्ण झाली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे. यानंतर पंचायत समिती सभापतीपदांसाठी महिला राखीव पदांची सोडत काढली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Ravikant Tupkar : पिक विम्यापोटी खात्यात फक्त १९ रुपये? शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे का?
ग्रामविकास विभागाने ३० सप्टेंबर २०२२ रोजी निश्चित केलेल्या आरक्षणाचा लाभ न घेतलेल्या जिल्हा परिषदांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. १९६२ च्या नियम २ (अ) नुसार पुढील अडीच वर्षांसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आरक्षित ठरविण्यात आले आहे.
ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी १९६२ च्या नियमांनुसार चक्रानुक्रम निकष लागू करण्यात आला आहे. तर पंचायत समितीच्या आरक्षणासाठी १९६१ च्या अधिनियमानुसार निकष ठरविण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या आरक्षणाचे चक्रानुक्रम १२ पंचायत समित्या पूर्ण होण्यापूर्वीच यावेळी नवे आरक्षण निश्चित झाले आहे.
चिखलदरा व धारणी या पेसा क्षेत्रातील पंचायत समितींची सभापतीपदे अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहेत. यापूर्वी येथे एसटी (खुला) आरक्षण होते; मात्र यावेळी एसटी (महिला) आरक्षण लागू झाले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद व पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता महिला राखीव सोडतीकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. सक्षम उमेदवार निश्चित करण्यासाठी गण व गटांच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर उमेदवारीसाठी इच्छुकांची कसोटी लागणार आहे.
Water crisis : रस्ता व पाणीप्रश्नावर बेलुरा ग्रामस्थांचा हंडा बजाव आंदोलन
१२ पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण
अनुसूचित जाती : १ (खुला), २ महिला
अनुसूचित जमाती : १ (खुला)
नामनिर्देशित प्रवर्ग : २ (खुला), २ महिला
सर्वसामान्य : २ (खुला), २ महिला








