Breaking

Local Body Elections : बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी निवडणुकीचा बिगुल!

Zilla Parishad elections will be held for 61 groups : जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रारूप जाहीर, राजकीय हालचाली वाढल्या

Buldhana राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा आता प्रत्यक्षात वळली आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या गटांची पुनर्रचना पूर्ण झाली आहे. आगामी निवडणूक ६१ गटांसाठी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील प्रारूप आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केला आहे.

या पुनर्रचनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख गावांचा समावेश नव्याने निश्चित करण्यात आलेल्या गटांमध्ये करण्यात आला आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये ६८ गट होते, परंतु आता ते ६१ वर आणले गेले आहेत. यामुळे राजकीय पक्षांचे गणित पुन्हा मांडले जाणार असून, गट रचनेनुसार इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना गती येण्यास सुरुवात झाली आहे.

Krushna Khopde : कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करा!

प्रारूप आदेशानुसार, गट रचनेविषयी नागरिकांनी किंवा राजकीय पक्षांनी काही हरकती असतील, तर त्या २१ जुलैपूर्वी संबंधित तहसीलदार कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम गट रचना निश्चित होणार आहे.

नवीन गटांमध्ये जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, मलकापूर, मोताळा, खामगाव, मेहकर, चिखली, बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा व लोणार या तालुक्यांतील प्रमुख गावे समाविष्ट आहेत. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यात खेर्डा बु., आसलगाव, संग्रामपूर तालुक्यात बावणबीर, शेगावमध्ये जलंब, नांदुरा तालुक्यात वडनेर भोळजी, मलकापूरमध्ये मलकापूर ग्रामीण, मोताळ्यात कोथळी, खामगावमध्ये अंत्रज व लाखनवाडा, मेहकरमध्ये देऊळगाव साकर्शा, चिखलीमध्ये अमडापूर, बुलढाण्यात सुंदरखेड, धाड, देऊळगाव राजामध्ये सावखेड भोई, साखरखेर्डा व लोणारमध्ये सुलतानपूर, बिबी, पांगरा डोळे यांचा समावेश आहे.

Municipal Council school : नगरपरिषद शिक्षकांच्या पेन्शनची फाईल मुख्यमंत्र्यांकडे

या गट रचनेच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची रणनीती नव्याने ठरवावी लागणार आहे. गट संख्येतील बदलामुळे अनेक विद्यमान सदस्यांनाही आपली भूमिका पुन्हा आखावी लागणार असून, संभाव्य इच्छुकांची गटवार रस्सीखेच लवकरच सुरू होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.