Voter list program announced : १० नगर परिषदा व दोन नगर पंचायतींसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर
Amravati राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठीचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्व ठिकाणी प्रभाग रचना अंतिम झाली असून, काही ठिकाणी आक्षेपांवर सुनावणी घेऊन आवश्यक बदलही करण्यात आले आहेत.
दरम्यान, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रथम नगर परिषदांच्या निवडणुका होणार असून जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यानंतर होतील, अशी प्रशासनात चर्चा आहे.
Cyber security : तिसरीपासूनच शालेय स्तरावर सायबर सुरक्षा शिक्षण !
जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, चिखलदरा, मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, शेंदूरजना घाट आणि धामणगाव रेल्वे या १० नगर परिषदा तसेच नांदगाव खंडेश्वर व धारणी या दोन नगर पंचायतींसाठी मतदार यादी कार्यक्रम लागू आहे.
मोर्शी व अचलपूर येथे आक्षेपांवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन काही बदल सुचवले आहेत. अन्य सर्व ठिकाणी आधीचीच प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. मतदार यादीसाठी १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन करण्यात येणार आहे.
Congress Levels Charges Against Ruling Front : मतांची चोरी सापडली, पण चोर अद्यापही फरार !
असा आहे कार्यक्रम
८ ऑक्टोबर : प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
८ ते १३ ऑक्टोबर : हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत
२८ ऑक्टोबर : अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी अधिप्रमाणित व प्रसिद्ध
७ नोव्हेंबर : मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध