व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Lonar taluka general meeting : कामे प्रलंबित राहिली तर याद राखा, आमदारांनी...

Lonar taluka general meeting : कामे प्रलंबित राहिली तर याद राखा, आमदारांनी अधिकाऱ्यांना खडसावले

mla siddharth kharat directed to issue notice the officials who were absent in general meeting : लोणार आमसभेत प्रश्नांचा भडिमार; अधिकारी गैरहजर असल्यास नोटीस बजावणार

Lonar तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी लोणार येथील श्री मंगल कार्यालयात भव्य आमसभेचे आयोजन करण्यात आले. या आमसभेला नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात होते, तर प्रमुख उपस्थितीत सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे उपस्थित होते. व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, उ. बा. ठा. सेनेचे तालुकाप्रमुख राजीव बुधवत, शिंदे गटाचे तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने, तहसीलदार भूषण पाटील, पीएसआय घोगरे, तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

Krupal tumane : शिंदेसेनेने तुमाने यांचा नागपूर-रामटेकशी ‘संपर्क’ तोडला; संजय निरुपम नागपूरचे संपर्कप्रमुख

 

आमसभेत घरकुल, अंतर्गत रस्ते, शेतातील पांदण रस्ते, महावितरणच्या समस्या, महसूल व ग्रामपंचायत स्तरावरील अडचणी अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांनी अनेक प्रश्न थेट आमदारांसमोर मांडत प्रशासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली.

Buldhana Congress : काँग्रेसमधील खांदेपालट कधी? जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चांना पुन्हा ऊत

विशेष म्हणजे, जे अधिकारी वेळेवर उपस्थित नव्हते त्यांच्याबाबत आमदार मनोज कायंदे यांनी तहसीलदारांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “नागरिकांच्या सर्व तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात. प्रत्येक प्रकरणाची लेखी माहिती मला द्यावी. संबंधितांची कामे प्रलंबित राहिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.” त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!