Lord Shri Ram : अकोल्यातून ८३४ जेष्ठ नागरिकांची विशेष तीर्थ रेल्वे !

Special pilgrimage train carrying 834 senior citizens leaves for Ayodhya from Akola : अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जाणार

Akola : देशाची ओळख प्रभू श्रीरामांच्या अयोध्या धामाशी जोडलेली आहे. त्या पावन स्थळाच्या दर्शनासाठी अकोला जिल्ह्यातील ८३४ जेष्ठ नागरिकांनी विशेष सहकार गौरव रेल्वेने रवाना होत तीर्थयात्रेचा शुभारंभ केला. ही यात्रा हनुमान जयंती आणि महात्मा फुले जयंती निमित्त आयोजित करण्यात आली असून सामाजिक समरसतेचा संदेश देणारी ठरत आहे.

विशेष तीर्थ रेल्वे आमदार रणधीर सावरकर यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री जेष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजनेंतर्गत सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार अनुप धोत्रे यांनी दिली. अकोला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वरून भारतीय गौरव तीर्थ रेल्वेने ही यात्रा सुरू झाली. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक कल्याण विभागाच्यावतीने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही यात्रा शक्य झाली आहे.

Swimming pool : जलतरण तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू !

आमदार वसंत खंडेलवाल कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी आमदार रणधीर सावरकर, कामगार आयुक्त माया केदार, सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड, विजय अग्रवाल, किशोर पाटील, जयंत मसने, गिरीश जोशी, माधव मानकर, तहसीलदार सुरेश कावरे, तलाठी माहोरे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील निवडक ८३४ जेष्ठ नागरिकांना श्रीराम मंदिराच्या दर्शनाचा लाभ घेण्याची संधी मिळाली आहे. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या राममंदिराच्या उभारणीचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने पूर्ण झाले. त्या मंदिराचे प्रत्यक्ष दर्शन घडवून देण्यासाठी सरकारकडून सर्व सोयी-सुविधा देण्यात येत आहेत. हे सरकार सर्वांचे आहे, हे कृतीतून दिसत असल्याचे मत आमदार सावरकर यांनी व्यक्त केले.

जयघोषाने दुमदुमले रेल्वे स्थानक..
रेल्वे रवाना होण्याच्या वेळी “जय श्रीराम”, “जय गजानन”, “हर हर महादेव”, “भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणांनी रेल्वे स्थानक दुमदुमले. या विशेष गाडीत १३ डबे आहेत. भोजन, पिण्याचे पाणी, डॉक्टर आणि औषध व्यवस्था पुरवण्यात आली आहे. भाजपच्यावतीनेही वैद्यकीय पथक यात्रेकरूंना सोबत पाठवण्यात आले आहे.

Farmers’ loan waiver : कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची वारी, लोणार तहसीलवर धडकले !

राम दरबार दर्शन, संकीर्तन, ढोल-ताशे, तुतारी, पुष्पवृष्टी अशा पारंपरिक स्वागताने यात्रेकरूंना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात प्रभू श्रीराम, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.