LPG crisis : सिलिंडर दरवाढीने पेटला काँग्रेसचा ‘चुल्हा’; महागाईवरून काँग्रेसचा भाजपवर निशाणा

Congress-protest-against-Modi-government-LPG-crisis : महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून केला स्वयंपाक

Nagpur काँग्रेसच्या कार्यकाळात पेट्रोल आणि सिलिंडरच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली तरी भाजपचे कार्यकर्ते चौकाचौकात आंदोलने करत असत, रस्त्यावर चुली पेटवल्या जात होत्या. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भाजप सत्तेत असून काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत.

गुरुवारी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी चक्क रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक केला, तर कार्यकर्त्यांनी हातात रिकामे सिलिंडर घेऊन सरकारविरोधी घोषणा दिल्या. काँग्रेसच्या काळात सिलिंडरची किंमत ४०० रुपये होती, ती भाजपने ९०० रुपयांच्या पार नेली आहे. आता त्यात पुन्हा ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सामान्य जनतेला महागाईच्या झळा सोसाव्या लागत असून गॅस दरवाढीचा मोठा फटका बसला आहे.

Mahayuti government : जमिनींच्या वेगवान नोंदीसाठी झटपट १० हजार ६८३ कर्मचाऱ्यांची नोकर भरती

तसेच व्यावसायिक सिलिंडरची किंमतही १५० रुपयांनी वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे व्यावसायिक आणि कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढूनही त्याचा बोजा सर्वसामान्यांवर पडू दिला नव्हता, असे यावेळी आंदोलकांनी नमूद केले. याशिवाय सिलिंडर बुकिंगचा कालावधीही बदलल्याने सामान्य नागरिकांसमोर संकट उभे राहिले आहे.

Rohit Pawar rahul gandhi : रोहित पवार दिल्ली दौऱ्यावर, राहुल गांधीना भेटले

जनसामान्यांचे कंबरडे मोडू नये यासाठी ही दरवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या आंदोलनात नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, प्रदेश महासचिव अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार यांच्यासह शहरांतील विविध पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.