LPG crisis : जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पेटवली चूल!

congress-stage-protest-against-gas-cylinder-shortage-price-hike : गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Amravati गॅस सिलिंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी प्रतीकात्मक स्वरूपात चूल पेटवून केंद्र सरकारच्या महागाईविरोधात घोषणाबाजी केली तसेच दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली.

अमेरिका, इस्त्राईल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर झाल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. शासनाने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रत्येकी सुमारे ६० रुपयांची वाढ केल्याने सामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडला आहे. त्यामुळे सध्या एका सिलिंडरसाठी सुमारे ९४० रुपये मोजावे लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

https://sattavedh.com/30316-2nedarland-company-to-process-vidarbha-cotton-under-pm-mitra-textile-par

 

घरगुती सिलिंडरसोबतच व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही वाढल्याने हॉटेल, रेस्टॉरंट तसेच विविध लघुउद्योगांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. ग्रामीण भागात सिलिंडर उपलब्धतेची अडचण निर्माण झाल्यामुळे अनेक महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली असल्याचेही आंदोलकांनी नमूद केले.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, जयश्री वानखडे, डॉ. अर्चना आत्राम, मालती गवई, राजश्री जठाले, मैथिली पाटील आणि शिल्पा राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला.

PM mitra textile park : नेदरलँडची कंपनी करणार विदर्भातील कापसावर प्रक्रिया

या आंदोलनात किरण चंदवाडकर, आरती पिंपळे, सीमा तिवारी, हर्षा काळे, सारिका मेश्राम, सरस्वती पाटील, शारदा प्रजापती, आरती पांडे, अनिता राजवाडे, नीता मोहोड, संजय शिरभाते, प्रशांत महल्ले, अभिनंदन पेंढारी, गजानन जाधव, सुरेश रतावा, हाजी निसार, किशोर राईबोले, नौशाद अली, संजय बोबडे, अब्दुल रफिक, सादिक शाह, अरुण जयस्वाल, विजय वानखडे, बासित अजीज, विजय आठवले, धीरज हिवसे, विक्की वानखडे, निलेश गुहे, वैभव देशमुख, नितीन काळे, आशीष यादव, गुड्डू हमीद, प्रियाल मोहोड यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.