Mahavitaran Department : महावितरणचे विपुल चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला !

Employees of Mahavitaran of Pune Division Vipul Chaudhary attacked : आमदारांचे नातेवाईकच सुरक्षित नाही, तेथे सामान्यांचे काय?

Pune : पुणे महावितरणमध्ये कार्यरत असलेले विपुल संतोष चौधरी यांच्यावर काल (२० ऑगस्ट) रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. पुणे – सासवड मार्गावरील दिवे घाटात ही घटना घडली. बिलांची तपासणी आणि मंजुरी यावरून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एका ठेकेदारावर चौधरी यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या रडावर हा ठेकेदार आलेला आहेत. विपुल चौधरी हे विदर्भातील यवतमाळचे काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचे जावई आहेत. येथे आमदारांचे नातेवाईकच सुरक्षित नसतील, तर सामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विपुल चौधरी दुचाकीने पुण्याहून सासवडकडे जात असताना दिवे घाटात एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर दोन वार केले. पण हेल्मेट घातले असल्यामुळे त्यातून ते बचावले. डोक्यावर मारणे शक्य होत नसल्याचे बघून त्याच रॉडने पायावर वार करण्यात आले. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान चौधरी दुचाकीवरून खाली पडले आणि जीव वाचवण्यासाठी धावत सुटले. जवळपास ५०० मीटर धावत गेले, अशी माहिती त्यांची पत्नी विश्वती मांगुळकर-चौधरी यांनी ‘सत्तावेध’ला दिली. हल्लेखोरांनी दुचाकीने त्यांचा पाठलाग केला. दरम्यान मागून आणखी दोन दुचाकी आल्या. त्यामुळे हल्लेखोरांनी पळ काढला. अन्यथा चौधरी यांना जिवे मारण्याचाच हल्लेखोरांचा प्रयत्न होता, असेही कुटुंबीयांनी सांगितले.

NCP Politics : आज स्पष्ट होणार दादांची भूमिका? बंदद्वार चर्चेत पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र?

प्राप्त माहितीनुसार, संबंधित विद्युत ठेकेदाराच्या कामाची चौकशी वरीष्ट स्तरावर सुरू आहे. त्याचाच संशय घेऊन चौधरी यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. यापूर्वी चौधरी यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने माहितीच्या अधिकारात या ठेकेदाराच्या कामासंबंधी माहिती मागवली होती. त्याचाही संशय चौधरी यांच्यावरच संबंधित ठेकेदाराने घेतला.

दिवे घाटात ऐन मध्यात चौधरी यांच्यावर हल्ला झाल्यामुळे घाटाखालील फुलसुंगी आणि घाटाच्या वरील सासवड या दोन्ही पोलिस ठाण्यांत हे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. पोलिस चौकशी करत आहेत. या हल्ल्यामुळे महावितरणच्या फिल्डवर आणि कार्यायलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातारवरण पसरले आहे. अशी गुंडगिरी होणार असेल तर काम कसे करावे, असा प्रश्न अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पडला आहे.

Public Health department : दोन डॉक्टरांसह १४ जणांचे निलंबन, आरोग्य क्षेत्रात खळबळ

आमदार मांगुळकरांनी हलवली सूत्रे..
हा हल्ला झाला तेव्हा आमदार बाळासाहेब मांगुळकर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांना माहिती मिळताच स्थानिक आमदार विजय शिवतारे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. आमदार शिवतारे यांनी मांगुळकर यांच्या माहितीची दखल घेत पोलिसांना तात्काळ सुचना दिल्या. पोलिसांनी लगेच अॅक्शन मोडवर येत कारवाई सुरू केली. आता हल्लेखोर आणि सूत्राधाराला पोलिस केव्हा बेड्या ठोकणार, याची प्रतिक्षा महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जनसामान्यांना आहे.