Eknath Khadses Disclosure on the CD case! :
एकनाथ खडसेंचा‘सीडी’ प्रकरणावर गौप्यस्फोट !
Jalgaon : भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर, खडसे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली. या वेळी बोलताना खडसे यांनी ‘सीडी’ प्रकरणावर गौप्यस्फोट केला आणि गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले. माझे चॅलेंज स्वीकारावे आणि महाजन यांच्या संपत्तीची चौकशी करावी, तसेच प्रफुल्ल लोढा ची नार्को टेस्ट करावी अशी मागणी त्यांनी केली .
खडसे म्हणाले, मी नेहमी म्हणत आलो की, तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी लावीन. ही सीडी मला प्रफुल लोढा देणार होता. मात्र, त्यांनी ती सीडी मला दिली नाही. त्यामुळे मी बदनाम झालो. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रफुल लोढाची नार्कोटेस्ट करावी आणि गिरीश महाजन यांनी माझं चॅलेंज स्वीकारावं. महाजन यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशीही मागणी खडसे यांनी यावेळी केली.
Mahajan vs Khadse : गिरीश महाजन यांच्यामुळेच मुळेच मी भाजप सोडली
खडसे म्हणाले, गिरीश महाजन यांनी माझ्यावर ईडी संदर्भात खोटे गुन्हे दाखल केले. माझ्या जावयाला अडकवून जेलमध्ये टाकलं. मी स्वतः ईडीच्या खोट्या प्रकरणातून बाहेर पडलो. गिरीश महाजन म्हणाले होते की, हा विषय संपला आहे. पण प्रफुल लोढा जेलमध्ये आहे तोपर्यंत विषय संपणार नाही. एका वाघासमोर लांडग्यांची फौज उभी केली जाते, पण वाघ तो वाघ असतो.
Ladiki Bahin Yojana : लाडकी की लबाडी? हजारो अपात्र लाभार्थींचा पर्दाफाश !
तसेच, अजीत पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ईडीचे आरोप असूनही ते आता सत्तेत आहेत, हे कसे शक्य आहे? असा थेट सवालही खडसे यांनी उपस्थित केला.
खडसे यांच्या या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यात हनी ट्रॅप प्रकरणानंतर खडसे आणि महाजन वाद चांगलाच रंगला आहे. ते दोघेही एकमेकांवर दररोज आरोप प्रत्यारोप करत आहेत. महाजनांच्या आरोपाला उत्तर देताना त्यांनी आता महाजनांच्या संपत्तीची चौकशी आणि लोढाच्या नार्को टेस्ट ची मागणी केली आहे.
____