Breaking

Mahajan vs Khadse : मानसिक संतुलन बिघडले, मला त्यांची कीव येते

Girish Mahajans strong attack on Khadse :
गिरीश महाजनांचा खडसेंवर जोरदार हल्लाबोल

Mumbai : राजकारणात कटुता नवी नाही, पण मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. खानदेशातील हे दोन मातब्बर नेते पुन्हा एकदा एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. यावेळी महाजन यांनी थेट ‘हनी ट्रॅप’चा संदर्भ देत खडसेंवर जोरदार टीका केली आहे.

गिरीश महाजन म्हणाले, हनी ट्रॅपच्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई झाली. वेगवेगळ्या शहरांतील महिलांनी तक्रारी दिल्या आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल झाले आहेत. मग एवढं पोटसूळ उठण्याचं कारण काय? अशा शब्दांत त्यांनी खडसेंच्या ताज्या वक्तव्यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, त्यांचं मानसिक संतुलन खरंच बिघडलेलं आहे. मी नुकतीच त्यांची एक मुलाखत मोबाईलवर पाहिली. मला राग नाही येत त्यांचा, पण कीव येते. बोलण्यावर नियंत्रण नाही, भान नाही

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना यावर्षीचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’

महाजन यांचा रोख येथेच थांबला नाही. आता म्हणतात मी काय केलं? भोसरी प्रकरण सर्वांनाच माहिती आहे. तुम्ही चोऱ्यामाऱ्या करता, डाके टाकता आणि वर दिल्लीत जाऊन आमच्या नेत्यांच्या पायावर पडता. माफी मागायचा हा धंदा त्यांचा चाललेला आहे, असा घणाघात त्यांनी खडसेंवर केला. महाजन यांनी यावेळी संपूर्ण विरोधी पक्षांवरही टीकेची झोड उठवली. विरोधी पक्षांचा जनाधार उरलेला नाही. अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी काहीच भरीव कामगिरी केलेली नाही. त्यामुळे सरकारवर वैयक्तिक आरोप करून बदनामी करण्याचं काम सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला.

Suraj Chouhan : अखेर सूरज चव्हाण गुपचूप पोलीस ठाण्यात हजर

विधानसभेत येऊन उगाचच आरोप करायचे आणि पुरावे काहीच नसतात. असे आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जर काही पुरावे असतील तर ते अध्यक्षांकडे द्यावेत. लोकांना आता या फालतू आरोपांची चीड आली आहे, असं सांगत महाजनांनी विरोधकांना थेट सल्ला दिला. महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष नविन नाही. खडसे भाजपमधून बाजूला पडल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र गेल्या वर्षी त्यांनी पुन्हा भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तेच पक्ष, तेच विरोधक आणि पुन्हा एकदा परस्पर द्वेष ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात नवी राहिलेली नाही.

___