samruddhi-mahamarg-krushi-samruddhi-kendra-mla-manoj-kayande-meeting-demand : शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्यांवर तातडीच्या बैठकीचे मुख्यमंत्र्यांना पत्र; नवनगर प्रकल्पांतर्गत १० गावांचा समावेश
Sindkhedraja हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत नियोजित असलेल्या ‘कृषी समृद्धी केंद्रां’च्या उभारणीवरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या केंद्रांशी संबंधित शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी आमदार मनोज कायंदे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पत्र सादर केले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची तातडीची बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
समृद्धी महामार्गालगत उभ्या राहणाऱ्या या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीची संधी मिळणार असली तरी, काही तांत्रिक आणि प्रशासकीय निर्णया अभावी शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. निर्णय घेण्यास होणाऱ्या उशिरामुळे प्रकल्पाची गती मंदावली असून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची भूमिका आमदारांनी मांडली आहे.
Divyang protest : ‘त्या’ तक्रारींचे पुढे काय झाले? दिव्यांगांच्या प्रश्नांवर आश्वासनांची सरबत्ती
धोते, लखागंगा, बाबतरा, पुरणगाव, धायगाव, जांबरगाव, सावरगाव माठ, निमखेड, गोगाव आणि नरीराबाद या १० गावांचा कृषी समृद्धी केंद्रांमध्ये समावेश आहे. या भागातील भूसंपादन आणि मोबदल्याबाबत स्पष्ट धोरण ठरवण्याची मागणी पत्रात केली आहे.
कृषी समृद्धी केंद्रांचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून प्रशासकीय प्रक्रिया वेगवान झाली आहे. नवनगर प्रकल्पांतर्गत तीन कृषी समृद्धी केंद्रांचे काम पूर्ण झाले असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) आपला अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला आहे. जर या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला, तर संपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन समृद्धी महामार्गालगत कृषी आधारित उद्योगांचे जाळे निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Akola bar association : अकोला बार असोसिएशन अध्यक्षपदी अॅड. अजय वाघमारे
आमदार मनोज कायंदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याने आता या प्रकरणाला ‘हाय-प्रोफाईल’ वळण मिळाले आहे. नवनगर अंतर्गत नियोजित असलेल्या या केंद्रांमुळे स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. आता मुख्यमंत्री यावर कधी बैठक बोलावतात आणि शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्यांना प्रशासकीय हिरवा कंदील मिळतो का, याकडे संपूर्ण सिंदखेड राजा परिसरातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.








