Protest on the steps of Vidhan Bhavan : अधिवेशनाच्या नमनाला विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाची चढाओढ
mumbai : राज्याचे पावसाळी अधिवेशन आज सुरू झाले. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानभवनाच्या पायऱ्यावर सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही आंदोलन करण्याची चढाओढ पाहायला मिळाली. सत्ताधारी एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘कम ऑन किल मी’ या विधानाचा संदर्भ घेत हिंदी सक्तीला मीच स्वीकारले अशा आशयाचे बॅनर घेऊन आंदोलन केले. तर विरोधीकांनी पण आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय गाजला. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करु नये, अशी मागणी करत विरोधक या निर्णयाविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं झाले. अखेर त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय सरकारने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच रद्द केले. आजपासून राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं. हे अधिवेशन १८ जुलैपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात गेल्या काही दिवसांपासून समोर आलेल्या विविध मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut : लुटारू सरकारला रोज चाबकाचे फटके मारावेत, असा यांचा कारभार !
राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला असला तरी देखील विरोधक सरकारला जाब विचारत आहेत. या पार्श्वभूमीवरच विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी
‘मी मराठी’ असे लिहिलेल्या सोप्या घातल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांची कर्ज माफी, शक्तिपीठ महामार्गाचा विषय, लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपयांचं दिलेलं आश्वासन यासह इतर महत्वाच्या विषयांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.








