Maharashtra Education Department : शिक्षण उपसंचालक विद्यार्थ्यांसोबत वर्गात बसले

The Deputy Director of Education sat in the classroom with the students : शिक्षकांची शिकवणी बघितली, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Wardha नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक शाळेत येतात. ते थेट वर्गात जातात. त्यांच्यासोबत पीए नाही, सहकारी नाही. साहेब असल्याचा कुठलाही थाट नाही. वर्गात जाऊन मुलांसोबत बाकांवर बसतात. वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकाची शिकवणी तपासतात. हा प्रसंग एखाद्या सिनेमातला वाटत असेल. पण तसे मुळीच नाही. ही घटना सत्य आहे आणि वर्धा जिल्ह्यात घडली आहे. सध्या शिक्षण क्षेत्रात या घटनेची चांगलीच चर्चा होत आहे.

शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी चक्क विद्यार्थ्यांसोबत वर्गात बसून शिक्षकांची शिकवणी अनुभवली. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांचा वर्गही घेतला. त्यामुळे त्यांनी अध्ययन-अध्यापन करुन विद्यार्थ्यांसह शिक्षकांशीही संवाद साधला. शैक्षणिक गुणवत्ता मूल्यांकनाकरिता नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड हे वर्ध्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी ग्रामीण भागासह शहरातीलही काही शाळांना भेट देऊन थेट वर्गात विद्यार्थ्यांसाेबत बसून निरीक्षण केले.

Forest Smuggler : वाघाचे दात, नखं लंपास केले; चोरट्यांना अटक !

शिक्षकांची अध्यापन पद्धती तसेच शाळेचे कामकाज याचीही बारकाईने तपासणी केली. विशेष म्हणजे त्यांनी वर्ध्यात माध्यमिकचे शिक्षणाधिकारी म्हणून सेवा दिली असल्याने त्यांना जिल्ह्यातील शाळांचा आधीपासूनच अभ्यास आहे. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी पवनार येथील बांगडे विद्यालय तर वर्ध्यातील न्यू इंग्लिश विद्यालय व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयाला भेट दिली. येथील शाळा परिसर, वर्गातील अध्यापन पद्धतीची तपासणी केली. यावेळी माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. मनिषा भडंग यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

MLA Sajid Khan Pathan : महापालिकेतील गैरव्यवहारांची लवकरच पोलखोल

विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद
शिक्षण उपसंचालक नरड यांनी शाळांत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी गणिताचा वर्ग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्तरे दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मुक्तपणे संवाद साधल्याने विद्यार्थीही मनमोकळेपणाने व्यक्त झाले.