1.5 lakh unemployed people mocked in Chief Minister’s Youth Work Training Scheme : केवळ निवडणुकीपुरताच केला युवांचा वापर
Nagpur : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मागील वर्षी निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवांना आकर्षीत करून त्यांची मते महायुतीने मिळवली. निवडणूक झाल्यानंतर या योजनेत सहभागी झालेल्या युवांकडे साफ दुर्लक्ष केले. त्यानंतरही आजतागायत सातत्याने बेरोजगार युवकांची थट्टा सुरू आहे. या योजनेमध्ये राज्यभरात दीड लाख बेरोजगार विविध क्षेत्रांत काम करत आहेत.
या योजनेमध्ये १२वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर असलेल्या युवकांना प्रशिक्षण दिल्यानंतर रोजगाराच्या संधी देण्यासोबतच विद्यावेतनही ऑफर करण्यात आले. १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेदन दरमहा डीबीटीने देण्याचे ठरले. पण अजनही फेब्रुवारी महिन्यातील १५ दिवसांचे मानधन या लोकांना मिळालेले नाही.
Khadse vs Mahajan : महाजन म्हणतात, त्यांना माहीत होतं तर त्यांनी ‘ अलर्ट’ का केलं नाही ?
राज्यातील वाढीव मुदतीवर काम करणाऱ्या जवळपास दीड लाख बेरोजगारांना पाच महिन्यांपासून या योजनेचे विद्यावेतन मिळू शकलेले नाही. आता हे विद्यावेतन मिळेल की नाही, याचीही शाश्वती राहिलेली नाही. सरकारने निवडणुकीमध्ये युवांची मते मिळवण्यासाठी प्रलोभने दाखवून हा डाव आखल्याचा आरोप तरुण, युवा प्रशिक्षणार्थी करत आहेत. काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. आताही बेरोजगार तरुणांना मानधन न मिळाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Raut Vs Mahajan : गिरीश महाजन फडणवीसांनाही गाडल्याशिवाय राहणार नाही
योजना सुरूच, पण..
मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरू ठेवली आहे. पण सरकारी काम करणाऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही गेल्या पाच महिन्यांपासून आलेला नाही. घरखर्च, प्रवास खर्च, मोबाईल रिचार्ज सर्व स्वतःच्या पैशांतून करून हे लोक काम करत आहेत. पैसे न मिळूनही हे लोक रोज कामाला जातात. कारण आज ना उद्या विद्यावेतन मिळेल, अशी आशा त्यांना आहे. याउपरही पगान न मिळाल्यास हे युवा बेरोजगार आंदोलन करतील, हे मात्र निश्चित.