MLA Sudhir Mungantiwar presents aggressive stance in favor of Public Safety Bill : जनसुरक्षा विधेयकाच्या बाजूने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली भूमिका
Mumbai बहुचर्चित जन सुरक्षा विधेयक विधानसभेत मांडण्यात आले. या विधेयकावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. यावेळी विधेयकाच्या बाजूने मत मांडताना माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. नक्षलवादी तसेच डाव्या-कडव्या विचारसरणीला ठणकावून सांगायचे आहे की, आम्ही ‘भारत माता की जय’वाले आहोत. गडचिरोली, चंद्रपूर भागातील लोकांनी नक्षलवाद कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, पण त्यांचा भत्ता थांबवण्यात आला आहे. तो सुरू करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे यावेळी केली.
जनसुरक्षा विधेयकावर बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, हा कायदा डाव्या विचारांच्याविरुद्ध नाही. नक्षलवाद काय असतो हे आम्ही अनुभवले आहे. गडचिरोली, चंद्रपूरने नक्षलवाद जवळून पाहिलाय. या विधेयकावर कारण नसताना विरोधक शंका, संदिग्धता, भीती व्यक्त करत आहेत. सर्वसामान्य लोकांमध्ये चुकीची माहिती, नरेटिव्ह पसरवण्याचे काम होऊ नये. हे विधेयक सामान्य माणसाच्या रक्षणासाठी आणण्यात आले आहे. आपण पण सामान्यासाठीच्या रक्षणाचा धावा केला पाहिजे.
Adv. Abhijit Wanjari : उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्राध्यापकांची ३६०० पदे रिक्त!
शस्त्राने वार केला तर एखाद दुसरा जखमी होऊ शकतो पण विचारांनी वार केले तर त्याचा परिणाम अनेकांवर होऊ शकतो. या विधेयकात सूचना करताना दोष ठेवायचा आणि नंतर त्यावर बोलत राहायचे हे चुकीचे आहे. या विधेयकाला आपण का घाबरत आहात? न्यायव्यवस्थेवर लोकशाहीवर आपला विश्वास नाही का?, असा सवालही त्यांनी केला.
आपल्याला दहशतवाद, नक्षलवाद मोडीत काढायचा आहे. गडचिरोलीत जो नक्षलवाद होता त्यावर आपण उपाय म्हणून G-16 अभियान राबवलं. त्यानंतर काय झालं? राक्षस जसं रूप बदलून येतो तसंच हा नक्षलवाद रूप बदलून येत आहे. त्यांनी आता रूप बदलले. ते आता जंगलात न बसता विद्यापीठाच्या लायब्ररीत, सायबर कॅफेमध्ये बसू लागले आहेत. नक्षलवादी डाव्या-कडव्या विचारसरणीला ठणकावून सांगायचे आहे की, आम्ही भारत माता की जय म्हणणारे आहोत. चंद्रपूर ,गडचिरोलीच्या जनतेने आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र आपण त्यांचा भत्ता बंद केला आहे. विशाल मनाने हा भत्ता सुरू करण्यात यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
Dr. Nitin Raut : ‘त्या’ विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर कारवाई करा, माजी मंत्र्याची मागणी
स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये यासाठी जनसुरक्षा विधेयक आणण्यात आले आहे. असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विधेयक मांडले. त्यावर विविध सदस्यांनी आपले मत व्यक्त केले. विधेयकाच्या बाजूने आणि विरोधातही चर्चा झाली. शेवटी चर्चेनंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.