Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना प्रचंड वेग !

Fadnavis calls Uddhav Thackeray after meeting Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन !

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी घडल्या. सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि जवळपास पाऊण तास चर्चा झाली. तर दुसरीकडे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींनी राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, “राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोन उद्धव ठाकरेंना आले. त्यांनी मतदानासाठी विनवणी केली. त्यांनी इतरांनाही केले असतील, त्यांचं कामच आहे,” असा चिमटा त्यांनी भाजपला काढला.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. मविआतील वरिष्ठ नेत्यांशी ते चर्चा करणार असून, एनडीएच्या उमेदवाराला पाठिंब्याबाबतही बोलणी होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फोन केला. अशी माहिती समोर येत आहे.

Raj – Fadnavis Visit : कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी गेले असतील !

सकाळपासून सुरू झालेल्या या दोन राजकीय घडामोडींनी राज्यात नवे राजकीय समीकरणं तयार होण्याच्या चर्चांना वेग आला आहे. राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले. नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचं सांगण्यात येत असलं तरी, या भेटीमागे राजकीय अर्थ शोधले जात आहेत. कारण कालच बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला.

Mahayuti Government : जिल्हा पुरवठा कार्यालयात २३.५७ लाखांची अफरातफर!

भाजप नेत्यांनी निकालानंतर ‘ब्रँड ठाकरे’वर जोरदार टीका केली. मात्र उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला करताना, राज ठाकरेंबाबत भाजप नेत्यांचा सूर सौम्य होता. त्यांनी टीका टाळत सहानुभूती दाखवल्याने, भाजपला अजूनही राज ठाकरे आपल्याकडे परततील अशी अपेक्षा असल्याच्या चर्चांना हवा मिळाली.  अशा परिस्थितीत राज ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीला गेल्याने, त्यांनी भाजप महायुतीकडे परत जाण्याचे दोर पूर्णपणे तोडलेले नाहीत, अशी चर्चा सुरू झाली आहे.या भेटीत नक्की काय घडलं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

_____