Maharashtra politics : उद्धव ठाकरे नव्हे, फडणवीसांचा मित्रपक्षांनाच इशारा !

Rohit Pawar’s suggestive remark on BJP rally speech : भाजप मेळाव्यातील भाषणावर रोहित पवारांचा सूचक टोला

Mumbai : भारतीय जनता पार्टीच्या ‘महाविजय संकल्प’ मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. “कोणीही एकत्र आले, तरी आमचा विजय थांबवू शकत नाही आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचाच महापौर होणार”, असा ठाम विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

फडणवीसांनी आपल्या भाषणात शिवसेना ठाकरे गटावरही अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एक ब्रँड होता, पण नुसतं ठाकरे नाव लावल्याने तुम्ही ब्रँड होत नाही.”

Reservation controversy : मुख्यमंत्र्यां समोर घोषणाबाजी, तर कुठे आत्मदहनाचा प्रयत्न !

मात्र, याच भाषणातील एका वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी म्हटलं होतं की, “कोणी सोबत आलं नाही तरी मुंबई महापालिकेवर आमचा भगवा झेंडा फडकेल.” यावर रोहित पवार म्हणाले की, हे वाक्य हे प्रत्यक्षात भाजपाच्या मित्रपक्षांनाच इशारा देणारं आहे.

रोहित पवार यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत लिहिलं, “पत्रकारांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, शूट करावं आणि त्याच्या क्लिपही साठवून ठेवाव्यात. काहीही झालं तरी मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार, हा मुख्यमंत्री देवाभाऊंनी दाखवलेला कॉन्फिडन्स मतदारयादी, ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात असल्याशिवाय शक्य नाही. यावर कळस म्हणजे फडणवीसांनी ‘कुणी सोबत आलं तरी आणि कुणी सोबत नाही आलं तरी’ असं सांगून आपल्या मित्रपक्षांनाही भाजपामागे फरपटत यावं लागेल, असा इशाराच दिला. हा आहे भाजपाचा खरा चेहरा.”

रोहित पवारांनी याच पुढे भाष्य करत भाजपाच्या सहयोगी पक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “भाई एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपाच्या खांद्यावर मान टाकून स्वाभिमानी बाणा दाखवतात की मान कापली जाईल या भीतीने भाजपामागे फरपटत जातात, हे पाहणं आता बाकी आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीसांनी मेळाव्यात माध्यम प्रतिनिधींनाही थेट आवाहन केलं होतं. ते म्हणाले, “इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, चित्रित करावं, क्लिप साठवून ठेवावी. काहीही झालं तरी मुंबईत महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. महापौर महायुतीचाच होणार, हे निश्चित आहे. कोणी सोबत आलं किंवा आलं नाही, याला काही फरक पडणार नाही.”

Bacchu Kadu : निवडणुकीसाठी ‘लाडक्या बहीणीं’चा वापर!

या वक्तव्यामुळे फडणवीसांचे बाण ठाकरे गटावर की मित्रपक्षांवर हे स्पष्ट नसले तरी, रोहित पवारांच्या सूचक टोलेबाजीमुळे आता राजकीय चर्चेला नवा रंग चढत आहे.