व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Reservation controversy : मुख्यमंत्र्यां समोर घोषणाबाजी, तर कुठे आत्मदहनाचा प्रयत्न !

Reservation controversy : मुख्यमंत्र्यां समोर घोषणाबाजी, तर कुठे आत्मदहनाचा प्रयत्न !

Confusion at Marathwada Liberation War Day program : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात गोंधळ गोंधळ

Sambhajinagar / Jalna / Beed : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात आज गोंधळाचा प्रसंग घडला. छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्री स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं आणि मराठवाड्याचा दौरा सुरू करण्यापूर्वी भाषण करत असताना काही ओबीसी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

“हैदराबाद गॅझेट रद्द झालेच पाहिजे”, “ओबीसी आरक्षण धक्का देणारे युती सरकार मुरदाबाद”, “छगन भुजबळ झिंदाबाद” अशा घोषणा देत आंदोलकांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून तिघांना ताब्यात घेतलं. यामध्ये रामभाऊ पेरकर (७०), शिवाजी गाडेकर (५९) आणि अशोक सिंग शेवगण (६२) यांचा समावेश आहे. हे सर्व कार्यकर्ते छगन भुजबळ समर्थक असून ओबीसी आरक्षण बचावासाठी काम करत आहेत.

Supreme court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्या

या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात येऊन नारेबाजी करणे म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे. प्रसिद्धीसाठी असं करणं योग्य नाही. मी त्यावर फार काही बोलणार नाही, ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो.”

यावर उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ओबीसी बांधवांच्या मागण्या योग्य आहेत. पण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी आंदोलन करणे हे व्यासपीठ चुकीचं ठरलं. या प्रकारासाठी जबाबदार म्हणजे अपयशी ठरलेली सुरक्षा यंत्रणा.”

दरम्यान, जालना येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विजय स्तंभाजवळील मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. पोलिसांनी हवेत तीन फैऱ्या झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याच दिवशी बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्याजवळ दोन तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. हे तरुण केज तालुक्यातील असून त्यांनी “न्याय द्या, न्याय द्या अजितदादा न्याय द्या” अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं. तर छत्रपती संभाजीनगर येथे रवींद्र पवार या तरुणाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी सिद्धार्थ उद्यानाजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या दिवशी भाष्य करताना म्हटलं, “मराठवाड्याला मुक्ती मिळाली, आता मराठ्यांना मुक्ती मिळायला हवी. कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरु होत आहे, ते जीआरच्या आधारे होत आहे की नाही हे मी पाहणार आहे. पावसामुळे मोठं नुकसान झालं, सरकारने सरसकट मदत करावी. दसरा मेळाव्यात मराठ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे.”

OBC Reservation Struggle : ओबीसी उपसमितीच्या बैठकीत साडेतीन हजार कोटींच्या योजनांवर चर्चा !

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा अभिमानाचा दिवस असताना, घोषणाबाजी, आंदोलन आणि आत्मदहनाच्या प्रयत्नांमुळे साजरा होणारा हा दिवस गोंधळाने भरून गेला.

error: Content is protected !!