Breaking

Maharashtra politics : मराठीसाठी हिंसक होणारच! गोळ्या घालणार का?

Sanjay Rauts direct question to Devendra Fadnavis. : संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल

Mumbai : मराठीसाठी आम्ही आक्रमक होणारच. काय करायचं ते करा ! अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी ‘ मातृभाषेच्या नावाखाली हिंसा खपवून घेतली जाणार नाही’ असं वक्तव्य केल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत म्हटलं होते की,
मराठी आलीच पाहिजे, पण मातृभाषेच्या नावाखाली हिंसा खपवून घेतली जाणार नाही, त्यावर कारवाई होईल या वक्तव्याचा समाचार घेत संजय राऊत म्हणाले, मराठी भाषेसाठी आम्ही हिंसाचार करणार. काय उखडायचं ते उखडा. गोळ्या घालणार का आमच्यावर? आम्ही मराठीसाठी प्रसंगी आक्रमक होणारच. हा महाराष्ट्र आहे, गुजरात नव्हे !

Ministers threat : “कानाखाली मारीन, बडतर्फ करेल, चमचेगिरी करु नको”

राऊतांनी फडणवीसांवर वैयक्तिक टीका करत म्हटलं की, 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलेल्या या राज्यावर तुमचा काही हक्क नाही. आज तुम्ही मुख्यमंत्रिपदावर आहात म्हणून गप्प आहात. पण उद्या ते गेले, की वेगळ्या विदर्भाची मागणी कराल हे आम्हाला माहिती आहे. गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा, मग महाराष्ट्राला शिकवा! गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर राऊतांनी त्यांच्यावरूनही फडणवीसांना लक्ष्य केलं.

Raut Vs Mahajan : गिरीश महाजन फडणवीसांनाही गाडल्याशिवाय राहणार नाही

“50 खोके एकदम ओके” या घोषणेचे जनक असलेले कैलास गोरंट्याल आज फडणवीसांच्या पक्षात सहभागी झाले आहेत,असेही राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने भाजप हादरले आहे.
फडणवीस अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. किती दिवस उद्धव ठाकरेंमध्ये अडकून पडणार? असा टोलाही त्यांनी लगावला.राऊत यांचा स्फोटक आरोप, फडणवीसांचा सूचक इशारा आणि ठाकरे विरुद्ध भाजप संघर्ष यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून लढाई पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

_____