Maharashtra politics : बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा डाव !

Shinde is his weapon, Sanjay Rauts attack : शिंदे त्यांचं हत्यार”, संजय राऊतांचा हल्ला

Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “भाजपला बाळासाहेबांची शिवसेना संपवायची आहे आणि त्यासाठी एकनाथ शिंदे हे फक्त त्यांचं हत्यार आहेत. भाजपला मुंबई गिळायची आहे, मराठी माणसांत फूट पाडायची आहे. महाराष्ट्रावर किंवा मराठी माणसावर त्यांचं प्रेम नाही, तर केवळ राजकीय स्वार्थासाठीच हा सगळा डाव आहे,” असा गंभीर आरोप राऊतांनी केला.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत महायुती म्हणून लढण्याचा दावा केला असला तरी ठाण्यात भाजप-शिंदे गट वेगळं लढण्याची शक्यता दिसत आहे. अजित पवारांनीही स्वबळावर निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “त्यांची युती ही अनैसर्गिक आहे. मुंबईवर डोळा आहे म्हणून ते एकत्र आहेत. मराठी माणसांत फूट पाडण्यासाठीच आमचं नाव, चिन्ह शिंदेंना देण्यात आलं.”

Farmers angry : ८ दिवस कुठे होतात? दौरा अर्धवट सोडून माघार !

राऊतांनी पुढे आरोप केला की, “शिवसेनेवर भाजपचं प्रेम आहे असं अजिबात नाही. त्यांना फक्त बाळासाहेबांची शिवसेना संपवायची आहे. शरद पवारांचं अस्तित्व संपवण्यासाठी अजित पवार हे हत्यार आहेत, तर आमच्यासाठी एकनाथ शिंदे हत्यार आहेत.”

शिंदे गटावर टीका करताना राऊत म्हणाले, “शिंद्यांचा पक्ष हा अमित शहांची बेनामी कंपनी आहे. त्यांचं फार काही महत्त्व नाही. भाजप त्यांना ५-२५ जागा फेकून देईल आणि सांगेल की मराठी माणसांची मतं फोडा. हे सगळे सुपारीबाज आहेत. सुपाऱ्या देतात, घेतात आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान होतं.”

OBC movement : मला शत्रूंपासून आणि स्वकियांपासूनही त्रास !

“एकनाथ शिंदे यांना १०० जागाही मिळणार नाहीत. पूर्वी मूळ शिवसेना ठरवायची कोणाला किती जागा द्यायच्या, आता मात्र शिंदे गट भाजपच्या दारात आश्रितासारखे उभे आहेत,” अशा शब्दांत राऊतांनी शिंदे गटावरही घणाघाती हल्ला चढवला.